प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरण! माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांची पहिली प्रतिक्रिया

प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरण! माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांची पहिली प्रतिक्रिया

Prajwal Revanna Sex Scandal : कर्नाटकमधील खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांचं सेक्स स्कँडल प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, हे सर्व आरोप प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर झाल्यानंतर त्यांनी भारतातून पळ काढला. त्यानंतर त्यांचे वडील एचडी रेवण्णा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. यानंतर आता माजी पंतप्रधान आणि प्रज्ज्वल रेवण्णा यांचे आजोबा आणि एचडी रेवण्णा यांचे वडील एचडी देवेगौडा यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

 

आरोप चुकीचे आहेत

देवेगौडा यांचा उद्या 91 वाढदिवस आहे. यानिमित्ताने माध्यमांशी बोलत असताना त्यांनी प्रज्ज्वल रेवण्णावर गुन्हा सिद्ध झाल्यास कायद्यानुसार जी काय शिक्षा असेल ती द्यावी अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, प्रज्ज्वल रेवण्णा सारख्या गुन्हेगाराला मोकळं सोडता कामा नये, असंही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर आपला मुलगा आणि प्रज्ज्वलचे वडील एचडी रेवण्णा यांच्यावर लावलण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, असंही ते म्हणाले.

 

हासन जिल्ह्यातील मतदान

या प्रकरणानंतर म्हणजे 27 एप्रिलपासून एचडी देवेगौडा हे बंगळुरूमधील निवासस्थानाच्या बाहेर आलेले नाहीत. दुसऱ्या टप्प्यात हासन लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी प्रज्ज्वल रेवण्णासाठी प्रचार केला होता. त्यानंतर सेक्स स्कँडल प्रकरण बाहेर आलं. त्यामुळे ते घराच्या बाहेर पडले नव्हते. 26 एप्रिल रोजी देवेगौडा यांनी हासन जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदान केलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रज्ज्वल रेवण्णाशी संबंधित सेक्स व्हिडीओ बाहेर आले आणि राज्यात खळबळ उडाली.

 

महिलांना न्याय मिळावा

एचडी रेवण्णा यांना ४ मे रोजी प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरण आणि अपहरण अशा खटल्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर 14 मे रोजी त्यांना जामीन मंजूर झाला. देवेगौडा म्हणाले की, प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणात आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने त्याचे समर्थन केलेले नाही. या प्रकरणात अनेक लोक गुंतलेले आहेत, असा आमचा आरोप आहे. पण यावेळी आम्ही कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही. जे जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि पीडित महिलांना न्याय मिळावा असेही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज