Download App

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू, तर 900 प्रवासी जखमी

  • Written By: Last Updated:

Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 233 झाला आहे. तर 900 प्रवासी जमखी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आज सकाळपर्यंत मदत यंत्रणांचे बचावकार्य सुरू असून, त्यामध्ये रेल्वेच्या बोगीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलला जात असताना बहंगा बाजार स्थानकावर सायंकाळी 7.20 वाजता ही घटना घडली. बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ घडलेल्या या अपघातानंतर आतापर्यंत 18 गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

ओडिशामध्ये दोन नाही, तीन ट्रेन धडकल्या ! कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताचे मुख्य कारण उघडकीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली. याशिवाय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ची जर्मनीत पुनरावृत्ती, दीड वर्षाच्या अरिहासाठी आईची याचना

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी 233 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. दरम्यान, विविध रुग्णालयात दाखल जखमी प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रक्तदान करत आहेत. रुग्णालयाबाहेर रक्तदात्यांच्या रांगा लागल्या आहेत.

Sanjay Raut : माझी जीभ दाताखाली आली म्हणून थुंकलो | LetsUpp Marathi

Tags

follow us