Download App

Mumbai Attack : तहव्वूर हुसैन राणाला कसाबसारखीच फाशीची शिक्षा?

मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर हुसैन राणाला अजमल कसाबसारखी फाशीची शिक्षा देण्याबाबतच्या मुद्द्यावर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

Mumbai Attack : मुंबईच्या 26/11च्या हल्ल्याचा (Mumbai Terror Attack) कथित सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा (Tahawwur Rana) याला कडक सुरक्षेत भारतात आणण्यात आलंय. आता वैद्यकीय तपासणीनंतर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए (NIA Court) त्याची चौकशी करणार आहे. यानंतर इतर तपास संस्था यात सहभागी होऊ शकतात. मात्र, तहव्वूर राणाला कसाबसारखीच फाशीची शिक्षा देता येणार की नाही? याबाबत सविस्तर पाहुयात..

वाल्मिक कराडाचा निर्दोष असल्याचा अर्ज, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितलं सविस्तर

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा याला भारतात आणले जात आहे. भारताने ठोस पुरावे दाखवले आहेत, त्या आधारावर त्याला अमेरिकेतून आणले जात आहे. पण, अजमल कसाबसारखंच राणाला फाशीची शिक्षा देणे शक्य नाही. या प्रकरणात भारताला आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पण कराराचे पालन करावे लागणार आहे. याअंतर्गत राणाला मृत्युदंडाची शिक्षा देता येत नाही किंवा त्याच्याविरुद्ध कोणताही नवीन खटला दाखल करता येत नाही.

‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’; ‘या’ तारखेला रिलीज होणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’

राणावर भारतात फक्त त्या प्रकरणातच खटला चालवता येईल जो त्याने त्याच्या प्रत्यार्पणादरम्यान अमेरिकन न्यायालयासमोर लेखी स्वरूपात सादर केला आहे. जरी भारताने राणाविरुद्ध अनेक खटले दाखल केले तरी, त्याच्याविरुद्ध फक्त तोच खटला चालवला जाईल जो प्रत्यार्पण न्यायालयासमोर लेखी स्वरूपात सादर केलेला आहे.

आम्ही कधीच बदलत नाही; ‘बापाचं नाव बदलण्याची वेळ’ म्हणणाऱ्या जलील यांना फटकारलं

प्रत्यार्पण न्यायालयासमोर न केलेल्या कोणतेही कलम भारताला या प्रकरणात नव्याने जोडता येऊ शकणार नाहीत. नियमांनुसार, राणाला खटल्याच्या आधारे म्हणजेच मुंबई हल्ल्याच्या आधारे भारतात आणण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्यावर फक्त मुंबई हल्ल्याचा खटला दाखल केले जाणार आहे. चौकशीदरम्यान त्याने भारतात केलेल्या इतर गुन्ह्यांची कबुली दिली तरीही नवीन कलमे लावता येणार नसल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राणा यांना जामीन मिळणार नाही आणि तुरुंगातून पॅरोलही मिळणार नाही. संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्याला तुरुंगातच राहावे लागेल. तसेच, भारतीय न्यायालय त्याला कोणतीही शिक्षा देईल, ती त्याला तुरुंगात भोगावी लागेल पण ती मृत्युदंड असू शकत नसणार आहे.

follow us