New Airlines : भारतात 3 नवीन विमान कंपन्या सुरु; NOC मिळाली, सरकारकडून मंजुरी…

भारतात नवीन 3 विमान कंपन्यांना मंजुरी मिळालीयं. सरकारकडून या तीन नवीन विमान कंपन्यांना एनओसी देण्यात आलीयं.

Airlines

Airlines

New Airlines NOC : भारतातील विमान प्रवाशांसाठी एक आनंदाची समोर आलीयं. काही दिवसांपूर्वी एअरलाईन इंडिगोचे (New Airlines NOC) उड्डाण वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने एकच गोंधळ उडाला होता. या गोंधळाचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर आता भारतात नवीन 3 विमान कंपन्यांना मंजुरी मिळालीयं. सरकारकडून या तीन नवीन विमान कंपन्यांना एनओसी दिलीयं.

जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते मुंबई आणि राज्य काय सांभाळणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आगपाखड

भारतात एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट आणि इतर विमान कंपन्या आधीच कार्यरत आहेत. या यादीत काही नवीन नावे सामील होणार आहेत. शंख एअर, अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस सारख्या विमान कंपन्या भारतीय आकाशात उड्डाण करण्यास सज्ज आहेत. यासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी निवेदन जारी करुन माहिती दिलीयं. मागील आठवड्यात अनेक विमान कंपन्यांच्या टीमशी भेट घेतली.

काँग्रेसची स्टार प्रचारकांची जम्बो यादी; कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणींची तोफ महाराष्ट्रात धडाडणार

शंख एअर, अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या 3 नवीन कंपन्यांना सरकारने मंजुरी दिलीयं. डीजीसीएने नवीन विमान कंपन्यांना मान्यता दिली असून राम मोहन नायडू म्हणाले, शंख एअर, एआय हिंद एअर आणि फ्लायएक्सप्रेस या नवीन विमान कंपन्यांची विमाने भारतात सेवा देणार आहेत. शंख एअरला मंत्रालयाकडून आधीच एनओसी मिळाले आहे. अल हिंद एअर आणि फ्लायएक्सप्रेसलाही या आठवड्यात एनओसी देण्यात आले आहेत. ते म्हणाले की, देशात शक्य तितक्या नवीन विमान कंपन्यांना प्रोत्साहन देणे हे मंत्रालयाचे ध्येय आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी सांगितले की, भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे.

रश्मिका मंदाना स्टारर ‘मायसा’ चित्रपटाचा पहिला ग्लिम्प्स प्रदर्शित; चाहत्यांमध्ये वाढला उत्साह

दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे ही वाढ शक्य झाली आहे. उडान योजनेमुळे लहान विमान कंपन्या बळकट झाल्या आहेत. स्टार एअर, इंडियावन एअर आणि फ्लाय 91 सारख्या विमान कंपन्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पुढील वाढीसाठी मोठी क्षमता आहे.

Exit mobile version