Download App

Uttarakhand Rain : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात 4 मजुरांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भूस्खलन होऊन 4 जणांचा मृत्यू झाला.

  • Written By: Last Updated:
Uttarakhand Landslides : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. (Landslides) येथील या जोरदार पावसामुळए मध्यरात्रीच्या सुमारास भूस्खलन होऊन 4 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व नेपाळी नागरिक असून मजुरीचे काम करत होते.
महाराष्ट्र नक्की हे काय घडतय? अनाथाश्रमातील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकललं, साताऱ्यातील घटना

माहितीनुसार, उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. फांटा हेलिपॅडजवळ ढिगाऱ्याखाली अडकून चार नेपाळी मजुरांचा मृत्यू झाला. तुल बहादूर, पूर्ण नेपाळी, किष्णा परिहार आणि दीपक बुरा अशी मृतांची नावं आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंग राजवार यांनी सांगितलं की, पहाटे १.२० च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं.

Maharashtra Band: उद्याचा महाराष्ट्र बंद विकृती विरुद्ध संस्कृती; दुपारी दोनपर्यंत कडकडीत बंद पाळा

राजवार बोलताना म्हणाले, ढिगाऱ्यात अडकलेले चारही लोक बचाव पथकाला मृतावस्थेत सापडले आहेत. हे सर्व नेपाळी नागरिक आहेत. त्यांचे मृतदेह जिल्हा आपत्ती बचाव दल (डीडीआरएफ) टीम रुद्रप्रयाग येथे आणत आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि जिल्हा आपत्ती बचाव दलाच्या पथकांनी हे बचाव कार्य केलं.

https://twitter.com/ANINewsUP/status/1826788151849091256
follow us