Chamoli Avalanche : चमोली अपघातात एक मोठी बातमी समोर आली आहे. या अपडेटनुसार, चमोली अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर आता देखील पाच जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. तर 46 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
लष्कराच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सकाळी 5.30 ते 6 च्या दरम्यान झालेल्या हिमस्खलनामुळे माना (Mana) आणि बद्रीनाथ (Badrinath) दरम्यान असलेले बीआरओ कॅम्प (BRO Camp) बर्फाने झाकले गेले होते, ज्यामुळे आठ कंटेनर आणि एका शेडमध्ये 55 कामगार अडकले होते. शुक्रवारी पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला आणि रात्री काही काळासाठी बचाव कार्य थांबवण्यात आले होते.
#WATCH | Joshimath, Uttarakhand: On the Mana Avalanche incident, DM Chamoli, Sandeep Tiwari says, “The rescue operation that began yesterday, 33 workers were rescued yesterday. 17 more have been rescued today. In total, 50 people have been rescued, 5 people are still missing and… pic.twitter.com/Ek8qkMsBbf
— ANI (@ANI) March 1, 2025
शनिवारी हवामान स्वच्छ झाल्यावर बचाव कार्यात हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. मात्र हवामान पुन्हा खराब होत असल्याने बचाव कार्य मंदावण्याची शक्यता आहे. जर हवामान अनुकूल राहिले तर आम्ही लवकरच उर्वरित कामगारांना शोधू अशी माहिती लष्काराने दिली आहे.
On February 28, 2025, an avalanche hit a BRO camp near Mana village, Chamoli, trapping workers. 50 rescued, 4 dead, 5 still missing as the Indian Army deploys helicopters. Heavy snowfall hampers operations.#UttarakhandAvalanche #RescueOperation #BRO #IndianArmy #Chamoli… pic.twitter.com/8NIVDUjyta
— The CSR Journal (@thecsrjournal) March 1, 2025
भारतीय हवाई दलाने केली तयारी
चामोलीच्या माना भागात शोध आणि बचाव कार्यात तैनात करण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून ड्रोन-आधारित इंटेलिजेंट बरीड ऑब्जेक्ट डिटेक्शन सिस्टम एअरलिफ्ट केले जाईल. ही सिस्टिम डेहराडूनला विमानाने नेली जाईल आणि तेथून हेलिकॉप्टरने माना भागात नेली जाईल अशी माहिती आयएएफकडून देण्यात आली आहे.