Char Dham Yatra : जोशीमठजवळ कोसळली मोठी दरड, बद्रीनाथ माहमार्ग ठप्प, हजारो पर्यटक अडकले

Char Dham Yatra : जोशीमठजवळ कोसळली मोठी दरड, बद्रीनाथ माहमार्ग ठप्प, हजारो पर्यटक अडकले

crack collapsed near Joshimath : उत्तराखंडमधील जोशीमठ हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून नेहमी चर्चेत येत असतं ते तेथील दुर्घटनांमुळे. या ठिकाणी गुरूवारी पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. सध्या चार धाम यात्रा सुरू आहे. त्यामुळे घटनेनंतर पर्यटक आणि स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंर बद्रीनाथ माहमार्ग बंद करण्यात आला आहे. तर हजारो पर्यटक या भागात अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे.

ही दरड कोसळण्याचं कारण नैसर्गिक नाही तर या जोशीमठाजवळ हेलंग खोऱ्यामध्ये एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाचं काम सुरू आहे. त्यासाठी येथे जमिनीखाली सुरूंग लावले जात आहे. अशाच एका सुरूंगामुळे दरड कोसळल्याचा अंदाज सध्या येथीव नागरिक व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणानंतर प्रशासनाने चार धाम यात्रा सुरू थांबनली आहे.

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल

या घटनेचा व्हिडीओ सध्यी माध्यमं आणि सोशल मिडीयावर पाहायाला मिळत आहे. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ आहे. त्यामुळे पोलिसांनी गौचर (Gauchar), कर्णप्रयाग (Karnaprayag) आणि लंगासूमध्ये (Langasu) बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube