मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल

Maharashtra cm Eknath Shinde Meet Governor Ramesh Bais : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी होत आहे. यातच आगामी काळात राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत महत्वाचा निकाल हाती येणार आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार का? हा निर्णय प्रलंबित आहे. यातच आज राजकारणातील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घटना घडू लागल्या आहेत. हे सगळं सुरु असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्यामध्ये जवळपास तासभर बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या बैठकीत काहीतरी मोठा निर्णय होण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीमागचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण या भेटीचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी हे पदार्थ ठरतील ‘सुपरफूड’

निकालापूर्वीची ही भेट…
सध्या सुप्रीम कोर्टामध्ये राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. याचा निकाल हा कधीही जाहीर होऊ शकतो. हे सगळं असताना या निकालाच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे घडामोडी घडत असतात. अशा परिस्थितीत कोणताही पूर्वनियोजित दौरा नसताना मात्र अचानक मुख्यमंत्री शिंदे आणि राज्यपाल यांच्या भेटीची घटना घडत आहे. यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांची ही पहिलीच भेट आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube