मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी हे पदार्थ ठरतील ‘सुपरफूड’
Healthy Food For Kids: मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी त्यांचा आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. आपली मुलं हुशार, चंचल असावीत असे प्रत्येक पालकांना वाटत असते. मुलांच्या भविष्यासाठी पालकांकडून देखील हालचाली केल्या जातात. मात्र आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी काय केले पाहिजे हे अनेकांना समजत नाही. मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होणे आवश्यक आहे.
मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. अनेकदा लहान मुलांना मसालेदार किंवा गोड पदार्थ खायला आवडतात. मात्र या गोष्टी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नसतात.म्हणूनच आपल्या पाल्यांनी काय खावे जेणेकरून त्यांची बुद्धीमत्ता विकसित होईल याबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेऊ.
दूध : शरीराच्या वाढीसाठी दूध हे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुधाच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणावर फायदे हे मिळत असतात. दुधात सर्व पोषक घटक असतात जे आपल्या लहान मुलांसाठी खूप महत्वाचे आहेत. त्यात व्हिटॅमिन डी, फॉस्फरस, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात. म्हणूनच मुलांचा आहार कमी करू नका.
अंडी : अंडी हे सर्व वयोगटातील लोकांसाठी सुपरफूडसारखे आहे. तुमचे मूल एक वर्षाचे झाल्यावर त्याला अंडी खायला द्या. यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-डी, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे मुलांचा योग्य मानसिक विकास होतो.
सुका मेवा : आपण आजवर सुकामेवा खाण्याचे अनेक फायदे हे ऐकले असतील. यातच काजू, बदाम, सुके अंजीर आणि अक्रोड यांसारखी सुकी फळे आपल्या मुलांसाठी खूप फायदेशीर आहेत, ते फक्त त्यांचे मन तीक्ष्ण करत नाहीत तर शरीराला भरपूर ऊर्जा देतात. म्हणूनच त्याचे कमी प्रमाणात सेवन करत रहा.
हिरव्या भाज्या : हिरव्या भाज्या आपल्या आणि मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, यातून शरीराला अनेक प्रकारचे पोषक तत्व मिळतात. मुलांच्या रोजच्या आहारात पालक, ब्रोकोली, कोबी यासारख्या गोष्टींचा समावेश जरूर करावा.