‘बद्रीनाथ’मध्ये भाजपाचं पानिपत; उत्तराखंडमधील दोन्ही जागा काँग्रेसच्या खात्यात..
Uttarakhand By Poll Results 2024 : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला. समाजवादी पार्टीची सरशी झाली. अनेक जागांवर भाजपाचे उमेदवार पराभूत झाले. ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर उभारलं त्या अयोध्येतही (Ayodhya) भाजपला विजय मिळवता आला नाही. विशेष म्हणजे राज्यात भाजपाचं सरकार असतानाही इतकी पडझड झाली. अशीच परिस्थिती उत्तराखंड राज्यातील (Uttarakhand By Poll Result) दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत झाली आहे. यात बद्रीनाथ (Badrinath) मतदारसंघाची चर्चा देशभरात होत आहे. येथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेंद्र भंडारी यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार लखपत बुटोला 5224 मतांच्या आघाडीने विजयी झाले आहेत. राज्यात भाजपाचं सरकार असतानाही पक्षाला बद्रीनाथ आणि मंगलौर या मतदारसंघात विजय मिळवता आला नाही.
विधानसभा पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चा जलवा; भाजपला धक्का देत सहा जागा जिंकल्या
उत्तराखंडमधील मंगलौर आणि बद्रीनाथ या दोन्ही मतदारसंघात 10 जुलैला मतदान झालं होतं. आज मतमोजणी होऊन निकाल हाती आले. मंगलौर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत झाली. परंतु, भाजप उमेदवार करतार सिंह भडाना यांचा फक्त 422 मतांनी पराभव झाला. देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बद्रीनाथ मतदारसंघातही भाजपाचं पानिपत झालं. येथे काँग्रेस उमेदवार लखपत बुटोला यांनी भाजप उमेदवार राजेंद्र सिंह भंडारी यांचा 5 हजार 224 मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार नवल किशोर खली तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
बिहार-बंगालमध्येही एनडीएला धक्का
बिहारमधील रुपौली मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी बाजी मारली. सुरुवातीच्या फेऱ्यात जेडीयू उमेदवार कलाधर मंडल आघाडीवर होते. राजदच्या बीमा भारती दुसऱ्या क्रमांकावर होत्या. नंतर मात्र शंकर सिंह यांनी आघाडी घेत बाजी मारली. पश्चिम बंगालमधील राणाघाट मतदारसंघात टीएमसी उमेदवार मुकूट मणि अधिकारी यांनी 39 हजार 48 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. बागदा मतदारसंघात टीएमसी उमेदवार मधुपर्णा ठाकूर यांनी 33 हजार 455 मताधिक्याने विजय मिळवला आहे.
लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांची मोठी खेळी, अयोध्येचा खासदार भाजपचा खेळ बिघडवणार?
बिहारमधील रुपौली (Rupauli) मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी जेडीयू (JDU) उमेदवार कलाधर मडंल यांचा पराभव केला. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अमरवाडा मतदारसंघात भाजपाच्या कमलेश शाह (Kamlesh Shah) यांनी विजय मिळवला. या पोटनिवडणुका इंडिया आणि एनडीए दोघांसाठीही महत्वाच्या होत्या. सध्याच्या परिस्थितीत तर इंडिया आघाडी विजयी घोडदौड करताना दिसत आहे.