लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांची मोठी खेळी, अयोध्येचा खासदार भाजपचा खेळ बिघडवणार?

लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांची मोठी खेळी, अयोध्येचा खासदार भाजपचा खेळ बिघडवणार?

Lok Sabha Deputy Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधक (Lok Sabha ) आणि सत्ता पक्षामध्ये सुरुवातीला घमासान पाहायला मिळाल्यानंतर आता विरोधकांनी लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी आपली दावेदारी सांगायला सुरुवात केलीयं. (Deputy Speaker ) यावरुनच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि ममता बॅनर्जी यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी खासदार अवधेश प्रसाद यांना डेप्युटी स्पीकर पद देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी यावेळी अयोध्येतून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे आणि ते दलित समुदायातून येतात.
बिगर काँग्रेसी उमेदवाराचा प्रस्ताव ठेण्यात आला आहे.

व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना दिलासा; आजपासून किमतीत कपात, किती कमी झाली किंमत?

लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी गटाकडे असण्याची परंपरा आहे. परंतु, अवधेश प्रसाद यांना उपाध्यक्ष करणं भाजपसाठी अवघड असल्याचं बोललं जातंय. समाजवादी पक्षाने अयोध्येत विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनी एक बिगर काँग्रेसी उमेदवाराचं नाव पुढे केलं आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच अडचण झाली आहे.

नवे फौजदारी कायदे 1 जुलैपासून होणार लागू, गृहमंत्रालयाने काढली अधिसूचना; काय आहेत हे कायदे?

१९९० ते २०१४ पर्यंत लोकसभेचं उपाध्यक्षपदही सत्तापक्षाकडे होतं. २०१९ ते २०२४ पर्यंत उपाध्यक्षपदावर कुणाचीही निवड करण्यात आलेली नव्हती. लोकसभेच्या उपाध्यक्षांकडे अध्यक्षांप्रमाणेच प्रशासकीय ताकद असते. याशिवाय कुठल्याही कारणामुळे अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष हे जबाबदारी सांभाळतात. देशाच्या आठराव्या लोकसभेमध्ये उपाध्यक्षपद भरलं जाणार असलं तरी सतराव्या लोकसभेमध्ये हे पद रिक्त होतं. स्वातंत्र्यानंतर देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज