व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना दिलासा; आजपासून किमतीत कपात, किती कमी झाली किंमत?
L PG Cylinder Price Cut : तेल कंपन्यांनी महागाईपासून काहीसा दिलासा दिला आहे. (Cylinder) तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 30 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आज सोमवार (दि. 1 जुलै)रोजी एलपीजी (L PG) सिलिंडरच्या किमतीत बदल करून तो 30 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. एलपीजी सिलिंडरचे दर 30-31 रुपयांनी कमी झाले आहेत, ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी लागू आहे.
30 रुपये स्वस्त पेपरफुटीला बसणार आळा! कठोर कायदा लागू; दहा वर्षे कारावास अन् एक कोटी दंड
दरम्यान, सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. मात्र, घरगुती सिलिंडरऐवजी व्यावसायिक सिलिंडरवर दिलासा देण्यात आला आहे. याचा अर्थ रेस्टॉरंट मालक आणि ढाबा मालकांना या कपातीचा फायदा होईल. जे लोक व्यावसायिक एलपीजी वापरतात त्यांना आजपासून 30 रुपये स्वस्त सिलिंडर मिळणार आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.
गॅस सिलिंडर कुठे स्वस्त झाला?
1 जुलै 2024 पासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 30-31 रुपयांनी कमी झाली. या सिलिंडरची किंमत दिल्लीत 30 रुपयांनी तर कोलकाता, चेन्नई आणि मुंबईत 31 रुपयांनी कमी झाली आहे. या कपातीनंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 1676 रुपयांऐवजी 1646 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात 1756 रुपयांना, चेन्नईमध्ये 1809.50 रुपयांना आणि मुंबईत 1598 रुपयांना मिळेल. त्याचप्रमाणे, पाटण्यात 1915.5 रुपये आणि अहमदाबादमध्ये 1665 रुपयांना व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होईल.
मुंबईमध्ये 802 कोण होणार शिक्षक आमदार?, नाशिक विभागात आज मतमोजणी, प्रशासन सज्ज
जर आपण 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरबद्दल बोललो तर तो दिल्लीमध्ये 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईमध्ये 802 रुपये आणि चेन्नईमध्ये 818 रुपयांना उपलब्ध आहे. लवकरच महागड्या गॅस सिलिंडरपासून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा सर्वसामान्यांना आहे.