युद्धाच्या झळा! HPCL पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठ्यात 50 टक्के कपात; अनेक पंप कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर

HPCL petrol pumps वर इंधन पुरवठ्यात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. अनेक पंप कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

HPCL Petrol Pumps

HPCL Petrol Pumps

50 percent reduction in fuel supply at HPCL petrol pumps in Gujarat; Many pumps on the verge of running dry : अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या अकरा दिवसांपासून सुरु असणाऱ्या युद्धामुळे भारतासह जगातील अनेक देशात गॅस आणि तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर दुसरीकडे भारतात देखील अनेक शहरात गॅस पुरवठा विस्कळीत होताना दिसत आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी देशात इंधनाचा तुटवडा नाही असा मेसेज हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीकडून (Hindustan Petroleum Company) सर्व ग्राहकांना पाठवण्यात आला होता. मात्र आता याच एचपीसीएल कंपनीच्या पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे HPCL पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठ्यात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. अनेक पंप कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

भोंदूगिरीच्या आड काळा खेळ? अशोक खरातवर जमीन हडपल्याचा आणि हत्येचा गंभीर आरोप

गुजरातमध्ये अनेक शहरांमध्ये एचपीसीएल कंपनीच्या पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे HPCL पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठ्यात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. अनेक पंप कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी पंपांवर रांगाच्या रांगा लावल्या आहेत. तसेच जे पंपांना अगोदर दिवसाला चार टँकर पेट्रोल दिले जात होते त्यांना 2 टँकर पेट्रोल कंपनीकडून देण्यात येत आहे.

Video : युद्धाचा परिणाम दीर्घकाळ टिकू शकतो, कोरोना संकटाप्रमाणे तयार राहावे लागेल : मोदी

त्याच बरोबर आवश्यक तेव्हढाच इंधन पुरवठा केला जाणार आहे. साठेबाजी किंवा जास्तीच पेट्रोल तसेच ज्या कंपन्या जास्त प्रमाणामध्ये इंधन खरेदी करतात. तो पुरवठा देखील कमी केला जात आहे. यावर राकोटमध्ये पंप मालकांनी कंपनीसोबत ही चिंता व्यक्त केली असता. त्यांनी इंधनाची कमतरता नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याने ही अडचण निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते, भोंदू बाबाच्या कृत्यांवर फडणवीस आक्रमक

दरम्यान गेल्या काही दिवासांपूर्वी देखील कंपनीने (HPCL) देशात इंधनाचा तुटवडा नाही. देशभरात गॅस आणि इतर इंधनाचा भरपूर साठा उपलब्ध असल्याची माहिती हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीने आपल्या ग्राहकांना दिली होती. तसेच नागरिकांनी चिंता करू नये असे आवाहन देखील कंपनीकडून ग्राहकांना करण्यात आले होते.

Exit mobile version