पंजाबमध्ये दुर्दैवी घटना; टायर फुटल्याने भाविकांनी भरलेली बस अनियंत्रित, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

भाविकांनी भरलेली एक बस अचानक अनियंत्रित होऊन उलटली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 25 जण जखमी झाले आहेत.

Untitled Design 92

Untitled Design 92

6 people died in a terrible accident : पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली एक बस अचानक अनियंत्रित होऊन उलटली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 25 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे 35 ते 40 भाविक होते. हे सर्वजण आनंदपूर साहिब येथे दर्शन घेऊन आपल्या मेन माजरी गावाकडे परतत होते. याच दरम्यान, बस्सी पठाणाजवळ ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हा अपघात अत्यंत भीषण होता. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला, तो ऐकून मी घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे बस उलटलेली होती आणि प्रवासी मदतीसाठी आक्रोश करत होते. परिसरातील ग्रामस्थ्यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बसबाहेर काढण्यास मदत केली. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अपघातानंतर घटनास्थळी त्वरित रुग्णवाहिका पोहोचू शकल्या नाहीत. सुरूवातीला फक्त एकच रुग्णवाहिका आल्याने अनेक जखमींना खासगी वाहनांतून रुग्णालयात नेण्यात आलं. यामुळे मदतकार्यात काहीसा विलंब झाला असला तरी, स्थानिक लोकांच्या तत्परतेमुळे अनेकांचा जीव वाचला.

परिवहन मंत्री सरनाईकांचा मोठा निर्णय, 1 मेपासून मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांचे परवाने रद्द होणार

या भयावह अपघातात जखमी झालेल्या एका महिलेने सांगितले की, अचानक बसचा टायर फुटला, ज्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं. बस एका बाजूला झुकली आणि रस्त्याशेजारील एका खांबाला जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की, बसमधील प्रवासी सीटवरून उडून खाली पडले. या घटनेबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे. फतेहगड साहिबचे एसएसपी शुभम अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास घडला. प्राथमिक तपासात बसच्या तांत्रिक बिघाडामुळे वाहन अनियंत्रित झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

Exit mobile version