Shravan Monday : बिहारमधील जहानाबाद येथील सिद्धेश्वरनाथ मंदिरात मोठी दुर्घटना घडली. (Shravan) श्रावण सोमवार असल्यामुळं भगवान शिवच्या जलाभिषेकाच्या वेळी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. १२ पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर आहे.
आजपासून श्रावण महिन्याला प्रारंभ; पहिल्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?
आज श्रावण सोमवार असल्याने अनेक भाविक सिद्धेश्वरनाथ मंदिरात भगवान शिवला जलाभिषेक करण्यासाठी गर्दी करतात. मंदिरात प्रवेशासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी अचानक धक्का-मुक्कीमुळे रेलिंग तुटल्याने ही चेंगराचेंगरी घडली. भक्तांची धावपळ सुरु झाली आणि त्यामुळे हे दुर्दैवी अपघात घडला.
Government Schemes : श्रावण बाळ योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
प्रशासनाची कारवाई
दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मृतांच्या शवाचे पोस्टमार्टमसाठी पाठवलं आहे आणि जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना आवश्यक ती मदत केली जात आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.