Download App

जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ला; स्थानिक अन् परराज्यातील ७ कामगारांचा मृत्यू

सोनेनबर्ग येथील एका बांधकामाधीन बोगद्याजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला. डॉ. शाहनवाज, फहीम नजीर, कलीम, मोहम्मद हनीफ, शशी अब्रोल

  • Written By: Last Updated:

Terrorist Attack In Jammu and Kashmir Ganderbal : जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये काल रात्री दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी स्थानिक आणि परराज्यातील मजुरांवर गोळीबार केला. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. (Kashmir) तर, काही जण जखमी झाले आहेत. सोनेनबर्ग येथील एका बांधकामाधीन बोगद्याजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला. डॉ. शाहनवाज, फहीम नजीर, कलीम, मोहम्मद हनीफ, शशी अब्रोल, अनिल शुक्ला आणि गुरमीत सिंग अशी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत. तर, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सैनिकांनी सदरील परिसराची नाकेबंदी केली आहे.

Congress First list : मोठी बातमी! काँग्रेसच्या 54 उमेदवारांची यादी निश्चित; महत्त्वाची नावं आली समोर

follow us

संबंधित बातम्या