Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आमच्या रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. यामध्ये एमआयसीयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या सहा रुग्णांचा समावेश आहे. आरोपांबाबत रुग्णालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सर्वांचा मृत्यू आजाराने झाला आहे.
दरम्यान, नेल्लोरच्या जिल्हा रुग्णालयात 8 रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजनअभावी रुग्णांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. दुसरीकडे, रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले लावत आजारपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता नाही, असे सांगितले आहे.
त्याचबरोबर या प्रकरणी शासकीय सामान्य रुग्णालयाच्या अधीक्षकांनी नेल्लोर रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी झालेल्या कथित मृत्यूंबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात रुग्णालयाच्या अधीक्षकांनी ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. इतर कारणांमुळे रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
गुजरातमध्ये पावसाचे थैमान, पुरात म्हशी, गाड्या गेल्या वाहून, धक्कादायक VIDEO व्हायरल
या घटनेवरुन काँग्रेसने मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या जोरदार टीका केली. राज्यात आरोग्य यंत्रणा खळखिळी झाली असून नागरिकांचे जीव जात असल्याचा आरोप केला आहे. सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आली आहे.