Download App

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ऑपरेशन सिंदूरमधील 9 अधिकाऱ्यांना मिळणार वीरचक्र

Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 6 मे रोजी भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)

  • Written By: Last Updated:

Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 6 मे रोजी भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) लॉन्च करत हवाई हल्ले करत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारले होते. तर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत या ऑपरेशनमध्ये सहभागी होणाऱ्या 9 अधिकाऱ्यांना वीरचक्र (Vir Chakra) देण्याचा निर्णय घेतला आहे.  15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला सरकारने ही घोषणा केली. वीरचक्र हा भारतातील तिसरा सर्वात मोठा लष्करी पुरस्कार आहे.

तर दुसरीकडे 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 6 मे रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील डझनभर दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारले होते. भारतीय सैनिकांनी या ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या मुरीदके आणि बहावलपूर सारख्या दहशतवादी मुख्यालयांनाही उद्ध्वस्त केले होते.

आम्ही भाजपसोबत पंचवीस वर्षे फुकट घालवली ; उद्धव ठाकरेंचा घणाघात 

आता सरकार या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या नऊ अधिकाऱ्यांना वीरचक्र देऊन सन्मानित करणार आहे. या ऑपरेशन दरम्यान भारतीय हवाई दलाने सहा पाकिस्तानी विमाने पाडली होती. पाकिस्तानच्या भ्याड कृत्यांना प्रत्युत्तर देण्याव्यतिरिक्त, भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली देखील उद्ध्वस्त केली होती.

भव्यदिव्य सेटवर चित्रीत होणार रहस्यमय ‘घबाडकुंड’; दिसणार चमत्कारीक गोष्टी 

follow us