Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सरकाराल 26 मे रोजी नऊ वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्ताने लेट्सअप मराठीने मोदींच्या गेल्या 9 वर्षातल्या कारकिर्दीवर खास सिरीज सुरु केली आहे. (9 Years of Modi Government) या सिरीजमधील चौथा विषय आज तुमच्यासमोर मांडणार आहोत. आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष 9 चर्चेतील वक्तव्य ( Big statement ) जाणून घेणार आहोत.
1. पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीतील गाजलेलं पहिलं वक्तव्य म्हणजे, उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर नरेंद्र मोदींनी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारवर हिंदू मुस्लिम यांच्यात भेदभाव करत असल्याचा आरोप करत, गावात कब्रस्तान बांधलं, तर स्मशानभूमीही बांधली पाहिजे. रमजानमध्ये वीज असेल तर दिवाळीतही आली पाहिजे, असं म्हटलं होतं.
2. मल्लिकार्जुन खरगे यांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद झाला होता. महत्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं होतं. तुम्ही कोणत्या घराण्यातून आला आहात. तिथून साधा कुत्राही आला नाही, असं वक्तव्य खरगे यांनी केलं होतं. याला उत्तर देताना मोदी म्हणाले होत, इतिहास केवळ पुस्तकात राहिला, तर समाजाला प्रेरणा मिळत नाही. तेव्हा आम्ही किंवा आमचा कुत्रा होता का माहिती नाही. अन्य लोकांकडे कुत्रे असू शकतात. आम्ही कुत्र्यांच्या परंपरेत वाढलो नाही, असं विधान मोदींनी केलं होतं.
३. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल सभागृहात बोलताना मोदींची जीभ घरसली होती. सिंग यांच्या काळात इतके घोटाळे झाली की, त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा डाग नव्हता. बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला राजकारण्यांनी सिंग यांच्याकडून शिकायला हवी, असं मोदी म्हणाले होते.
४. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी मोदींनी परदेशात काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. कॅनडात बोलताना मोदी म्हणाले होते, आमचं ध्येय कौशल्य भारत आहे. पण, पूर्वी भारताला ‘स्कॅड इंडिया’ म्हणून ओळखलं जात होते.
५. २०१६ साली कोलकातामध्ये पूल कोसळल्याची दुर्घटना घडली होती. यावरून पंतप्रधान मोदींनी हा देवाचा इशारा असल्याचं सांगितलं होतं. ज्या पद्धतीने सरकार चालवण्यात येते आहे, हा देवाचा इशारा आहे. आज हा पूल तुटला… उद्या हे सरकार संपूर्ण बंगाल उद्ध्वस्त करणार..
६. दोन दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झालाय. बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले. ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर दिलेल्या भाषणात मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचं म्हटलं आहे.
9 Years of Modi Government : ऐतिहासिक कार्यकाळातील 9 वादळी निर्णयांचा आढावा
७. २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौऱ्यावेळी केलेल्या विधानावरून बराच गदारोळ झाला होता. त्यांनी म्हटलं होतं, पूर्वी भारतीय म्हणून जन्माला आल्याची लाज वाटायची. पण, आता देशाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत आहे.
८. देशात २०२० साली करोना व्हायरसने थैमान घातलं होतं. तेव्हा अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी अहोरात्र काम करत होते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवा तसंच घंटा वाजवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं.
९. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या चौकीदार या प्रतिमेला देशपातळीवरील स्थानिक वर्गाशी जोडले होते. केवळ मी एकटाच चौकीदार नाही, भ्रष्टाचाराची लढाई लढणारा, सामाजिक गुन्हेगारीशी लढणारा आणि वाईट प्रवृत्तींवर नजर ठेवणार प्रत्येक भारतीय चौकीदार असल्याचं मोदींनी म्हटलेलं.