ज्ञानवापी प्रकरणात मोठा निर्णय! मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा मिळाला अधिकार

Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरणात आज (दि.31) बुधवारी मोठा निर्णय आला आहे. ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू (Hindu)पक्षाला देण्यात आला आहे. हे तळघर मशिदीच्या खाली आहे. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला 15 दिवसांत बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. झारखंडमध्येही राबडीदेवी पॅटर्न? CM होण्याची चर्चा असलेल्या कल्पना सोरेन आहेत तरी कोण? आता येथे नियमित पूजा […]

Dnyanwapi

Dnyanwapi

Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरणात आज (दि.31) बुधवारी मोठा निर्णय आला आहे. ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू (Hindu)पक्षाला देण्यात आला आहे. हे तळघर मशिदीच्या खाली आहे. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला 15 दिवसांत बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

झारखंडमध्येही राबडीदेवी पॅटर्न? CM होण्याची चर्चा असलेल्या कल्पना सोरेन आहेत तरी कोण?

आता येथे नियमित पूजा होणार आहे. काशी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे पूजा करण्यात येणार आहे. हिंदू पक्षाने हा मोठा विजय असल्याचे म्हटले असून 30 वर्षांनंतर न्याय मिळाल्याचा दावा केला आहे. नोव्हेंबर 1993 पर्यंत येथे पूजा केली जात होती.

या प्रकरणात हिंदूंच्या बाजूने दावा केला आहे की, नोव्हेंबर 1993 पूर्वी तत्कालीन राज्य सरकारने व्यास तळघरातील पूजा थांबवली होती. ते पुन्हा सुरु करण्याचे अधिकार दिले पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती.

भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, CM शिंदेंचे आमदार आक्रमक; महायुतीत धुसफूस

दुसरीकडे, मुस्लिम बांधवांच्या बाजूने प्रार्थनास्थळ कायद्याचा हवाला देत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावत हिंदूंच्या बाजूने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे.

1993 नंतर तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशावरून तळघरातील पूजा बंद करण्यात आली. 17 जानेवारी रोजी व्यासजींचे तळघर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान तळघर स्वच्छ करण्यात आले.

काशी विश्वनाथ ट्रस्ट अंतर्गत तळघरात पूजा केली जाणार आहे. ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचे काम काशी विश्वनाथ ट्रस्ट करणार आहे.

Exit mobile version