सर्व भारतीयांचा DNA एकच, हिंदू राष्ट्राचा सत्तेशी काहीही संबंध नाही; सरसंघचालकांचे मोठे विधान

सर्व भारतीयांचा DNA एकच, हिंदू राष्ट्राचा सत्तेशी काहीही संबंध नाही; सरसंघचालकांचे मोठे विधान

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित संघ यात्रेची १०० वर्षे: नवे क्षितिज या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी हिंदू राष्ट्र आणि भारतीय एकतेवर महत्त्वाचे विचार मांडले. त्यांनी सांगितले की, हिंदू राष्ट्राचा सत्तेशी काहीही संबंध नाही, कोणताही संबंध जोडला जाऊ नये. हिंदू राष्ट्र म्हणजे सर्वांना समान न्याय देणारी, सर्व धर्मांचा आदर करणारी संस्कृती आहे. हिंदू कोण आहे? जो आपल्या मार्गावर चालतो आणि इतरांच्या मान्यतांचा आदर करतो, तोच खरा हिंदू, असे भागवत म्हणाले.

तो त्यांचा हक्क! मराठा सामाजाच्या शांतता मोर्चाची जगात नोंद, सरकार पक्षपाती.., आव्हांडांच ट्वीट 

भागवत पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या 40 हजार वर्षांपासून भारतात राहणाऱ्या लोकांचा डीएनए एकच आहे. भारताची संस्कृती विविधतेत एकता टिकवणारी आहे. आम्हाला एकसमानता नको, विविधता हीच आमची ताकद आहे, असे त्यांनी ठासून सांगितले. तसंच हिंदू राष्ट्र या शब्दाचा सत्तेशी काहीही संबंध नाही. जेव्हा आपण हिंदू राष्ट्र म्हणतो तेव्हा याचा अर्थ असा नाही की आपण कोणाचा विरोध करत आहोत. अखंड भारताच्या भूमीवर राहणारे लोक आणि आपली संस्कृती, सर्वजण एकत्रितपणे एकोप्याने राहण्याच्या बाजूनं आहोत, असं भागवत म्हणाले.

येडपट-खुळचट जरांगेंचं आंदोलन सत्तेच्या खेळासाठी…; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल 

भागवत म्हणाले, हिंदू कोण आहे? तर जो स्वतःच्या मार्गावर चालण्यावर विश्वास ठेवतो आणि वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांचा आदर करतो तो हिंदू आहे. आपला नैसर्गिक धर्म सर्वांशी समन्वय साधण्याचा आहे, हिंदू शब्दाचा अर्थ कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून, तो सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे, असं भागवत म्हणाले.

संघाची स्थापना भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी झाली असून, आता तो काळ आला आहे, असेही ते म्हणाले.

भागवत यांनी स्वामी विवेकानंद आणि वीर सावरकर यांचा उल्लेख करत सांगितले की, प्रत्येक राष्ट्राचा एक मिशन असते आणि भारताचे मिशन आहे मानवतेला नवी दिशा देणे. संघाचा उद्देश समाजाला एकजूट करणे आणि सामाजिक परिवर्तन घडवणे हा आहे. देशाचा उद्धार फक्त संघावर अवलंबून नाही, प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

आज संघाबद्दल बरीच चर्चा सुरू असते, परंतु त्यातील बहुतेक माहिती एकतर अपूर्ण किंवा ती प्रामाणिक नाही. म्हणून संघाबद्दल खरी आणि अचूक माहिती देणे महत्वाचे आहे. संघाबद्दलची चर्चा वस्तुस्थितीवर आधारित असावी, धारणांवर नाही, असं भागवत म्हणाले.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, अनुप्रिया पटेल, भाजप खासदार कंगना राणौत आणि बाबा रामदेव यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube