शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा नोंदवण्याचे न्यायालयाचे आदश, काय आहे प्रकरण?

पुराव्यांची गंभीर दखल घेत पोलिसांना तातडीनं गुन्हा नोंदवून सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

Avimukteshwaranand

सत्तेविरूद्ध बोलणं महागात पडणार, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरोधातील अडचणी वाढल्या आहेत. पॉक्सो न्यायालयानं (UP) अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या विरोधात झूसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

स्वामी रामभद्राचार्य यांचे शिष्य आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांच्या तक्रारीवरून पॉक्सो न्यायालयात सुनावणी झाली. विशेष न्यायाधीश (पॉक्सो कायदा) विनोद कुमार चौरसिया यांनी अविमुक्तेश्वरानंद तसंच इतर आरोपींविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. 13 फेब्रुवारी रोजी आशुतोष महाराज न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी दोन पीडित अल्पवयीन मुलांना न्यायालयात हजर केलं असून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले.

मृत्यूनंतर पाप-पुण्याचा हिशोब होणार, मोदी नरकात जाणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद भडकले

त्यानंतर न्यायालयानं 21 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली होती. या प्रकरणात प्रयागराज पोलीस आयुक्तांचा तपास अहवालही न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. दरम्यान, आशुतोष ब्रह्मचारी यांनी कथित घटनांची सीडी न्यायालयात सादर केल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांना न्याय मिळाला आहे आणि ते सत्य जनतेसमोर मांडण्यासाठी प्रयागराज ते विद्या मठ, वाराणसी अशी पायी सनातन यात्रा काढतील.

या प्रकरणामुळे धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलीस आता कायदेशीर कारवाई सुरू करतील. तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे. अविमुक्तेश्वरानंद यांच्यासह मुकुन्दनंद यांच्या विरोधात झूसी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे आणि तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वरिष्ठ वकील एस. के. मानस सांकृत्यायन टोपीवाला यांनी सांगितलं की, पॉक्सो प्रधान न्यायाधीशांनी प्रकरणातील सादर केलेल्या पुराव्यांची गंभीर दखल घेत पोलिसांना तातडीनं गुन्हा नोंदवून सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. एक प्रौढ मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी आरोप केला होता की, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या शिष्यांनी त्यांच्या गुरूंची सेवा करण्याच्या नावाखाली या मुलांवर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला.

Exit mobile version