Download App

Rahul Gandhi नावावर केले चार मजली घर; सरकारी बंगला खाली करण्याचा निर्णयावर दिल्लीतल्या महिलेचा निर्णय

  • Written By: Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावरील टीका केल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या एका मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरातच्या सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली, कोर्टाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांचा दिल्लीतील सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशभरात राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरु केले आहे. काँग्रेसकडून सोशल मीडियावर “मेरा घर, राहुल गांधीका घर”  हा ट्रेंड सुरु केला होता. सोशल मीडियावरचा हाच ट्रेंड आज प्रत्यक्षात देखील दिसून येत आहे. आज दिल्ली येथील काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्या राजकुमारी गुप्ता यांनी त्यांचे चार मजली घर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावे केले आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाची देशभर चर्चा सुरु झाली आहे.

Imtiyaz Jaleel : सरकारवर विश्वास नाही, दंगलीची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करा

राहुल गांधी यांना नोटीस

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, लोकसभा सचिवालयाने २४ मार्च २०२३ रोजी अधिसूचना जारी करून २३ मार्च २०२३ पासून त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्यामुळे लोकसभा खासदार म्हणून ते आता त्यांना देण्यात आलेल्या १२ तुघलक लेनमधील सरकारी निवासस्थानात जास्तीत जास्त एक महिना म्हणजेच २२ एप्रिल २०२३ पर्यंत राहू शकतात. त्यांना देण्यात आलेल्या या सरकारी घराचे वाटप २३ एप्रिल २०२३ पासून रद्द करण्यात येत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर भाजप – महाआघाडीची शक्ती पणाला…

सरकारच्या नोटीसला राहुल गांधी यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या उत्तरात त्यांनी म्हटले आहे की १२ तुघलक रोड येथील घरात ते मागील चार कार्यकाळापासून राहत आहेत. येथील लोकांसोबत त्यांच्या अनेक सुखद आठवणी आहेत. त्या आठवणी सोबत घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ हवा आहे. पण उत्तरात राहुल गांधी यांनी वेळेपूर्वी घर रिकामे करणार असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे राहुल गांधी आपले घर कधी खाली करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच दरम्यान राजकुमारी गुप्ता यांनी शनिवारी त्यांचे घर राहुल गांधी यांच्या नावावर केले. दिल्लीतील मंगोलपुरी येथील ४ मजली घर त्यांनी राहुल गांधी यांच्या नावावर केले आहे.

Tags

follow us