Download App

तुम्हाला जबाबदारी घ्यायची नसेल तर खुर्ची खाली करा; राज्यसभेत काँग्रेस नेते खरगेंनी सरकारला घेरलं

ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा सुरू आहे. यामध्ये राज्यसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला गंभीर प्रश्न विचारले.

  • Written By: Last Updated:

Mallikarjun Kharge On Pahalgam Attack In Lok Sabha : ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा सुरू आहे. (Pahalgam) यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, भाजपाचे खासदार सैन्य दलाचा अवमान करत होते, त्यावेळी पंतप्रधान मोदी गप्प का राहिले. तसंच, भारताचे पाच लढाऊ विमान पाडण्यात आलं, असं ट्रम्प म्हणाले. त्यावरही मोदी शांत का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, कोणताही पंतप्रधान असा नव्हता, तो कोणत्याही चर्चेत भाग घेत नाही. तो ११ वर्षांत कधीही सहभागी झाला नाही, तो सभागृहात बसत नाही असा थेट टोला खरगे यांनी लगावला आहे. मी लोकसभेत असताना एकदा सुषमा स्वराजजींनी मला पंतप्रधान मोदींना भेटायला सांगितलं. मी म्हणालो – ते देव आहेत का? की मी त्यांना भेटावं.

..त्यावेळी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता; प्रियंका गांधींचा गृहमंत्री अमित शहांच्या दाव्यांवर थेट पलटवार

म्हणून मी भाजपला सांगू इच्छितो की, कोणत्याही व्यक्तीला देव बनवू नका. हा एक लोकशाही देश आहे, जर तुम्ही येथे कोणत्याही व्यक्तीला देव बनवला तर तो हुकूमशाही बनतो. ड. आंबेडकरही त्याविरुद्ध बोलले आहेत. राजकारणातील भक्ती हुकूमशाही निर्माण करते. तुम्ही त्याला पंतप्रधान बनवलं आहे असा टोलाही घरगे यांनी लगावला.

भाजपवाले आम्हाला विचारतात काँग्रेसने काय केलं? किती दिवस काँग्रेसच नाव घेऊन जगणार आहात असं म्हणत खरगे यांनी भाजपला डिवचलं. तसंच, काँग्रेसने या देशाला उभं करण्यात योगदान दिलं. अनेक गोष्टी उभ्या केल्या. भाजपने काय केलं? असा थेट प्रश्न उपस्थित करत भाजपने फक्त खोट बोलण्याचा कारखाना काढला असंही खरगे यावेळी म्हणाले.

follow us