Download App

Petrol Diesel Prices Today : जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल – डिझेलच्या किंमती

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत पुन्हा एकदा तेजी बघायला मिळत आहे. (Crude Oil Price ) कच्या तेल ८६ डॉलच्यावर गेले आहे. (Crude Oil Price Update ) मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ब्रेंट क्रूड ०.२२ डॉलर किंवा ०.२६ टक्क्यांनी वाढून ती ८६.४० डॉलर प्रति बॅरल आणि WTI ०.१५ डॉलर किंवा ०.१९ टक्क्यांनी वाढून ८०.६१ डॉलर प्रति बॅरल करण्यात आले आहे. (Petrol diesel price hike ) मात्र, गेल्या काही महिन्यामध्ये कच्च्या तेलाच्या चढ- उताराचा प्रभाव देशात आणि राज्यात दिसला नाही. आजही भाव तेच आहेत.

दिल्ली शहरात एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लीटर विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल ९२.७६ रुपये दराने विकले जात आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत १०६.३१ रुपये आणि डिझेलची किंमत ९४.२७ रुपये आहे. तर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०२.६३ रुपये आणि डिझेलची किंमत ९४.२४ रुपये प्रति लीटर आहे.

राबडीदेवीनंतर आज लालूंचा नंबर, लॅण्ड फॉर जॉब घोटाळ्यात सीबीआय करणार चौकशी

या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

जयपूर शहरात पेट्रोल १०८.०८ रुपये आणि डिझेल ९३.३६ रुपये प्रति लिटर आहे. हैदराबाद शहरात पेट्रोल १०९.६६ रुपये आणि डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर आहे. पाटण्यात पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर आहे. लखनौ शहरात पेट्रोल ९६.३६ रुपये आणि डिझेल ८९.५६ रुपये प्रति लिटर आहे. चंदीगड शहरात पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर आहे. बेंगळुरू शहरात पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर आहे. नोएडामध्ये पेट्रोल ९६.६९ रुपये आणि डिझेल ८९.८६ रुपये प्रति लिटर आहे. गुरुग्राम शहरात पेट्रोल ९७.१० रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर आहे.

देशात राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या भावात शेवटचा बदल गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. या काळात केंद्र सरकारने पेट्रोलवर ८ रुपयांनी तर डिझेलवर ६ रुपयांनी उत्पादन शुल्क कमी केले होते.

तेल कंपन्यांकडून कच्च्या तेलाच्या भावातचा आढावा घेतल्यावर दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाहीर केले जातात. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे कर, डीलर कमिशन आणि वाहतुकीचा खर्च समाविष्ट आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला RSP डीलर कोड एसएमएसद्वारे 92249 92249 वर पाठवावा लागणार आहे, त्यानंतर तुमच्या मोबाईलवर नवीनतम पेट्रोल- डिझेलचे भाव दिसणार आहे.

Tags

follow us