Download App

पाच भाषांमध्ये गाणं गाणाऱ्या ‘त्या’ अवलियाचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एखादी गोष्ट झपाट्याने व्हायरल होते व एखादा रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येतो. सध्या सोशलवर एक गायक चांगलाच चर्चेत आहे. या गायकाने एक गाणे चक्क पाच भाषांमध्ये गायले आहे. त्याचे हे गाणे ऐकून चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गायकाचे कौतुक केले आहे. स्नेहदीप सिंग असे या गायकाचे नाव असून त्यांनी गायलेले गाणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही शेअर करण्यात आले आहे.

नेमकं कोणतं आहे हे गाणं?
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा आला होता. या सिनेमातील केसरिया तेरा इश्क है पिया… हे गाणं सध्या लोकप्रिय होत आहे. मात्र सध्या हे गाणे एका खास कारणाने चर्चेत आले आहे. गायक स्नेहदीप सिंगने हे गाणे चक्क एक दोन नव्हे तर पाच भाषांमध्ये गायले आहे. त्याचे हे गाणे चाहत्यांकडून पसंत केले जात आहे. हे गाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही शेअर करण्यात आले आहे. यामुळे मोदींना देखील या गाण्याची भुरळ पडल्याचे यामाध्यमातून दिसून आले आहे.

नेमकं काय म्हणाले मोदी ट्विटमध्ये?
पाच भारतीय भाषांमध्ये गायलेल्या या गाण्याबाबत पीएम मोदींनी ट्विटमध्ये लिहिले की हे भारताची एकता दर्शवते. प्रतिभावान स्नेहदीप सिंगचा हा अप्रतिम गाण्याचा व्हिडिओ पाहिला, मधुर आवाजाव्यतिरिक्त, हा व्हिडिओ (Video) ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या भावनेचे उत्तम उदाहरण आहे. उत्कृष्ट!”

मनीष सिसोदियांच्या कुटुंबियांच्या समर्थनार्थ धावले रोहित पवार, म्हणाले…

या पाच भाषांमध्ये गायले गाणं
स्नेहदीप सिंहने केशरिया तेरा रंग है पिया… हे गाणे गायले असून त्याने हे गाणे मल्याळम, तेलगू, कन्नड, तामिळ आणि हिंदी अशा 5 भाषांमध्ये गायले आहे.यासाठी सोशल मीडियावर (Social Media) स्नेहदीपचे खूप कौतुक होत आहे.

Tags

follow us