मनीष सिसोदियांच्या कुटुंबियांच्या समर्थनार्थ धावले रोहित पवार, म्हणाले…

मनीष सिसोदियांच्या कुटुंबियांच्या समर्थनार्थ धावले रोहित पवार, म्हणाले…

मुंबई : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत पुन्हा भर पडल्याचे दिसून येत आहे. सिसोदिया यांच्या कुटुंबीयांना त्यांचे निवासस्थान खाली करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यांचे मथुरा रोडवरील शासकीय घर हे नवी दिल्लीचे मंत्री आतिशी यांना देण्यात आले आहे. दरम्यान संकटांनी घेरलेल्या सिसोदिया यांच्या समर्थानार्थ आमदार रोहित पवार उतरले आहे. पवार यांनी सिसोदिया यांच्यावरील कारवाईवरील भाष्य करणारे एक ट्विट केले आहे.

नेमकं काय म्हंटले आहे रोहित पवार?
नियम पाळणं आवश्यक असलं तरी केवळ राजकीय सूडभावनेतून नियमबाह्य पद्धतीने अटक केलेल्या नेत्याच्या कुटुंबाला आधार देणंही तेवढंच महत्वाचं आहे. अशा परिस्थितीत @msisodia यांच्या कुटुंबाला 5 दिवसांत घर खाली करण्यास सांगणं हे चुकीचं वाटतं. त्याऐवजी नवीन मंत्र्याला वेगळं निवासस्थान देता आलं असतं आणि चुकीच्या पद्धतीने अटक केलेल्या नेत्याच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं जातं, असा संदेशही देता आला असता. जेणेकरून भविष्यात दडपशाहीपुढं गुडघे न टेकाता त्याविरोधात लढण्यासाठी इतरांनाही बळ मिळालं असतं.

जाणून घ्या प्रकरण?
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे मथुरा रोडवरील AB-17 बंगल्यात राहत होते. याच बंगल्यामध्ये यापूर्वी मुख्यमंत्री शीला दीक्षित देखील राहत होत्या. त्यांनतर आम आदमी पार्टीचे सरकार दिल्लीमध्ये सत्तेवर आल्यानंतर 2015 मध्ये सिसोदिया यांना हा बंगला देण्यात आला होता.

सिनेसृष्टीवर शोककळा! मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

मात्र सध्या सिसोदिया हे कथित भ्रष्टाचार आणि सत्येंद्र जैन कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात अटकेत आहेत. सिसोदिया यांनी आपल्या पदाचा देखील राजीनामा दिला आहे, त्यामुळे हा बंगला आतिशी यांना देण्यात येणार आहे. दरम्यान सिसोदिया यांनी राजीनामा दिल्यानंतर आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

फडणवीसांनी उल्लेख केलेला अनिल जयसिंघानी आहे तरी कोण?

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागच्या (PWD) आदेशाबाबत बोलताना आपचे खासदार संजय सिंह म्हणाले, आतिशी मंत्री असून त्यांना आता हा बंगला देण्यात आला आहे, त्यात चुकीचे काही नाही आहे. मनीष सिसोदिया आमचे भाऊ आहेत, त्यांचे कुटुंब आमचे कुटुंब आहे, आम्ही त्यांची काळजी घेऊ. तसेच मनीष सिसोदिया यांना भाजप दहशतवाद्यांप्रमाणे वागवत असल्याचेही संजय सिंह म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube