सिनेसृष्टीवर शोककळा! मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

सिनेसृष्टीवर शोककळा! मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

मुंबई : मराठी सिनेमा क्षेत्रातून एक महत्वाची व दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni) यांचे आज (18 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या सिनेकारकिर्दित त्यांनी आजवर 300 हुन अधिक सिनेमात काम केले आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेमातील योगदान फार मोठं आहे. आपल्या अनोख्या व विविधांगी भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. मराठी सिनेमातील त्यांची पात्र प्रेक्षक आवर्जून पाहत असत. त्यांच्या अभिनयाची दाखल घेऊन त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा फेसबुक, युट्यूबवर एंट्री

अनेक पुरस्कारांनी सन्मानित
भालचंद्र कुलकर्णी यांनी मराठी सिनेमांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी काही काळ अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालकपदही भूषविले होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जनकवी पी. सावळाराम, तसेच जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

अमृता फडणवीस यांच्याकडे 10 कोटींची खंडणीही मागितली होती…

300 हुन अधिक सिनेमांमध्ये काम केले
‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, नवरा नको गं बाई, सोंगाड्या, पिंजरा, थरथराट, मुंबईचा जावई, खतरनाक, माहेरची साडी अशा 300 हून अधिक चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. 1984 साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube