अमृता फडणवीस यांच्याकडे 10 कोटींची खंडणीही मागितली होती…
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार व या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. अमृता फडणवीसांना ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला न्यायालयाने 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. या सुनावणी दरम्यान सरकारी वालिकांनी धक्कादायक खुलासा केला आहे. अनिक्षा हिने अमृता फडणवीस यांच्याकडे तब्बल 10 कोटींची खंडणी मागितली. त्यामुळे या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला आहे .
नेमकं प्रकरण काय ? ते जाणून घ्या
अमृता फडणवीस या आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या अनिक्षा यांच्या संपर्कात होत्या. अनिक्षाचे वडिलांविरोधात केस चालू आहे. अनिक्षाचे वडील हे अनिल जयसिंघांनी उल्हासनगरमधील क्रिकेट बुकी होते. त्यांच्यावर 2010मध्ये फसवणुकीचे आरोप आहे. 2010 मध्ये त्यांना एका हॉटेलमधून रंगेहात अटक झाली होती
या प्रकरणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी अनिक्षाने अमृता यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी दाद दिली नाही. पुढे पाऊल टाकत अनिक्षाने अमृता यांना 1 कोटीची लाच देऊ करण्याचा प्रयत्न केला. असे तक्रारीत म्हंटले आहे. दरम्यान याचसंदर्भात अनिक्षाला अटक करण्यात आली आहे
काय आहे 10 कोटी खंडणी प्रकरण? जाणून घ्या
वडिलांना सोडवण्यासाठी लाच देऊनही प्रकरण मिटेना अखेर अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यासाठी काही व्हिडीओ आणि फेक ऑडिओ क्लिप बनवलेल्या होत्या. त्या सगळ्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स अमृता यांना पाठवण्यात आल्या होत्या. या सगळ्या क्लिप्स डिलीट करण्यासाठी तिने अमृता यांच्याकडे 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अन्यथा व्हिडीओ तसेच ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी अमृता यांना दिली असल्याचा खुलासा पोलिसांनी कोर्टात केला.
अमृता फडणवीस यांना धमकी देण्याची कुणाची बरं ताकत असेल ?गृहमंत्र्याच्या घरामध्ये जर सुरक्षितता नसेल तर महाराष्ट्र सुरक्षित कसा राहील?
गृहमंत्र्यांनी काही मुद्दे या घटनेच्या संदर्भाने सभागृहात मांडले आणि सभागृहातल्या सगळ्या सदस्यांचा लगेच विश्वास बसला !!!https://t.co/dQDiKrHu91 pic.twitter.com/yyoO5fgsKi— SushmaTai Andhare (@andharesushama) March 17, 2023
दरम्यान या प्रकरणावरून आता विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. धमकी, खंडणी, फसवणूक… या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.