A single ‘hit action plan’ will be applied to the cities of the country. : दोन दिवसांपूर्वी खारघर येथे निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं धर्माधिकारी यांच्या अनुयायांनी हजेरी लावली होती. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. दरम्यान, राज्यात उन्हाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळं राष्ट्रीय पातळीवर एकच हिट प्लॅन तयार करण्याचं केंद्र सरकारने ठरवलं आहे. सरकारने नागपुरातीतल विश्वश्वरय्या राष्ट्रीय संस्थेकडे (Vishwaswaraya National Institute) या हिट प्लॅन (hit plan) तयार करण्याची जबाबदारी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=j0aoXJfPJ4M
व्हीएनआयटीच्या डॉ. राजश्री कोठारकर यांना हा हिट प्लॅन तयार करण्याचे सांगण्यात आले. या हिट प्लॅन विषयी बोलतांना त्यांनी सांगितले की, सध्या प्रत्येक राज्याचा वेगळा हिट प्लॅन आहे. देशात 2016 पासून हिट प्लॅन आहेत. पहिल्यांदा हिट अॅक्शन प्लॅन अहमदाबादने बनवला. महाराष्ट्रतही हिट प्लॅनची अंमलबजावणी केली जाते. मात्र, हे हिट प्लॅन हे शॉर्ट टर्म आहेत. त्यामुळं दीर्घकालीन हिट अॅक्शन प्लॅनवर काम करून देशातील सगळ्या शहरांसाठी हिट प्लॅन एकच असावा, हा दृष्टीकोन ठेऊन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही जबाबदारी व्हीएनआयटी संस्थेवर सोपवली आहे.
उष्माघात नियंत्रणासाठी जास्त उष्ण भागातील रस्ते, इमारतीचे रंग, वृक्ष लागवडीसह इतर व्यवस्थापन कसे असावे, याबाबत सरकारकडे कोणताही ठोस आराखडा नाही. मात्र, दिवसेंदिवस ऊन तापायलालागला. वाढत्या उन्हाचा प्रकोप लक्षात घेता सरकारने हिट प्लॅन बनवण्याचं ठरवलं आहे. त्याचं काम राजश्री कोठारकर करत आहेत.
त्या म्हणाल्या की, गेल्या 10 वर्षापासून आम्ही यावर काम करत आहोत. देशात दीर्घकालीन हिट प्लॅनसाठी नागपुरातील तापमानाचा अभ्यास केला जात आहे. कुठल्या भागात जास्त, कुठे कमी तापमान आहे, या तापमानाचा लोकांवर काय परिणाम होतो, या सगळ्या बाबींचा अभ्यास करून या हिट प्लॅनचा आराखडा तयार करण्यात येत आहे. हिट प्लॅन तयार करण्यासाठी आम्ही जगभरातील हिट प्लॅनचा अभ्यास करून देशाचा हिट प्लॅन बनवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या दीर्घकालीन आराखड्यची अंमलबजावणीही इतर शहरं देखील करू शकणार आहेत. या हिट प्लॅनच्या आधारवरच अन्य शहरं स्वत:चा हिट प्लॅन बनवू शकणार आहेत. इंडोर तापमान कसं कमी करायचं, वृक्ष लागवडीचं व्यवस्थापन कसं करायचं यासहन अनेक बाबींवर प्रकाश टाकणात आला आहे. त्या त्या शहरातील तापमानाच्या समस्यांची कारणं, प्रश्न यांचा अभ्यास करून प्रत्येक शहर आपला हिट प्लॅन तयार करू शकेल.
हा प्लॅन शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म मध्ये बनवला असून त्यात काय केलं पाहिजे, हे सांगितलं आहे. प्रामुख्याने शॉर्ट टर्म हिट प्लॅनमध्ये डेथ कशी कमी होतील, आजार कसे कमी होतील यावर लक्ष दिल्या जातं. मात्र, दीर्घकालीन प्लॅनमध्ये याबाबीतर आहेतच, शिवाय व्यवस्थापन कसं करावं, ह्या बाबी समाविष्ट केल्या आहेत. हा आराखडा भविष्यात देशभर लागू होऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं.