कर्नाटकातील कलबुर्गीत भीषण अपघात; ट्रक-कारच्या समोरासमोर धडकेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

चित्तपूर तालुक्यातील लाडलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ही हृदयद्रावक घटना घडली.

Untitled Design 77 1

Untitled Design 77 1

A terrible accident occurred when a truck and a car collided head-on : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चित्तपूर तालुक्यातील लाडलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ही हृदयद्रावक घटना घडली. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्तपूर तालुक्यातील इंगलागी गावातील हे कुटुंब शुक्रवारी रात्री उशिरा यादगीर येथून आपल्या गावी परतत होते. गावातील एका आजारी नातेवाईकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची भेट घेऊन आणि प्रकृतीची विचारपूस करून कुटुंबातील सदस्य कारने घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.

मेलोडी चॉकलेटप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायत; रोहित पवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

लाडलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर पोहोचताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात तोलुसाब केशव, हुसेन शाह, मैबूब अली, रसूल बी आणि फातिमा अली यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारमधील पाचही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वाडी शासकीय रुग्णालयात पाठवले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची पाहणी केली असून, या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version