मेलोडी चॉकलेटप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायत; रोहित पवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असून, मेलोडी चॉकलेटप्रमाणे दर तीन ते चार दिवसांनी लिटरमागे 1-1 रुपयांची दरवाढ होत आहे

  • Written By: Published:
Untitled Design 76 1

Rohit Pawar’s strong attack on the central government : देशातील वाढत्या इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असून, मेलोडी चॉकलेटप्रमाणे दर तीन ते चार दिवसांनी लिटरमागे 1-1 रुपयांची दरवाढ होत आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. पुढील कालात इंधन दरात तब्बल 50 रुपयांची वाढ झाली तरी आश्चर्य वाटणार नाही, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.

सोशल मीडियावर पोस्ट करताना रोहित पवार यांनी अच्छे दिनच्या घोषणेवर देखील निशाणा साधला. सुरूवातीला टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचे प्रयोग झाले, तर आता परदेशात फिरू नका, पेट्रोल-डिझेल वाचावा, सोनं खरेदी करू नका आणि तेल खाऊ नका, असे सल्ले देण्याची वेळ सरकारवर आली आहे, अशी टीका त्यांनी केली. स्वातंत्र्यानंतर लोकांवर अशा प्रकारच्या निर्बंधांचा अप्रत्यक्ष दबाव टाकणारे हे पहिलेच दैदिप्य्मन सरकार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

 

इंधन दरवाढीबाबत बोलताना त्यांनी उपहासात्मक भाषेत म्हटले की, मेलोडी चॉकलेटच्या पॅकेटप्रमाणे एका लिटरमागे 50 रुपये वाढ झाली तरी कुणालाही धक्का बसणार नाही. मात्र, एवढी वाढ झाली म्हणून कुणी 1 लिटर पेट्रोल-डिझेल गिफ्ट देणार नाही. पेट्रोलपंपांवर तासनतास रांगेत उभे राहून देखील इंधन मिळेल याची खात्री उरलेली नाही, अशी नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली.

TCS लैंगिक छळ प्रकरणात अत्याचार आणि SC-ST अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल; 1500 पानी आरोपपत्र दाखल

दरम्यान, राज्यातील डिझेल तुटवड्यावरून देखील त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश भागात डिझेलचा मोठा तुटवडा जाणवत असून, शेतीच्या मशागतीची कामे ठप्प होत असल्याचा दावा त्यांनी केला. 10 ते 15 तास रांगेत उभे राहून देखील शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही. सर्वाधिक तक्रारी याच भागातून येत आहेत. या भागांतील लोकांना जाणीवपूर्वक वंचित ठेवलं जात आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

साठेबाजीचा आरोप शेतकर्यानवर करणे चुकीचे असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना डिझेल काही फुकट मिळत नाही आणि तासनतास रांगेत उभं राहायला त्यांच्याकडे वेळही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आगाऊ रक्कम भरून देखील पेट्रोलपंप चालकांना पुरेसा डिझेल मिळत नसल्याने केवळ निर्देश देऊन समस्या सुटणार नाही, तर मूळ अडचण सप्लाय चेनमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्र सरकारने वेळेत आणि पुरेसा इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देखील त्यांनी केली.

follow us