Supriya Sule : पुणे : दिल्लीच्या सीमेवर सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्विटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता, असा खुलासा ट्विटरचे तत्कालीन सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) केला. दरम्यान, यावरून विरोधकांनी आता सरकारवर टीका केली जात आहे. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)हे अत्यंत धक्कादायक असून या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी, अशी मागणी पंतप्रधान कार्यालयाकडे (Prime Minister’s Office) केली आहे. (A threat to democracy in the country, Supriya Sule attacked the modi government over the issue of pressure on Twitter)
प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयालाच टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारवर टिका करणारा प्रत्येक आवाज दाबण्यासाठी दबाव होता. तसेच सरकारचे ऐकले नाही, तर भारतातील ट्वीटरचे कार्यालय देखील बंद करण्याच्या धमक्या दिल्याचे जॅक यांचे म्हणणे आहे. हे आरोप अतिशय गंभीर आहेत. देशातील लोकशाही व्यवस्थेला धोका तर आहेच. शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच देखील आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सारी सरकार मालिकों को धमकाने में लगी है क्या? मंत्री जी मालिक के नाम पर एक पत्रकार को धमकी देती हैं, मंत्री जी जिस मोदी सरकार में काम करती हैं, वो ट्विटर के मालिक को धमकी देती हैं कि पत्रकारों के अकाउंट बंद करें। इनका झगड़ा मुग़लों से नहीं है, उन मालिकों से है जिनके पत्रकार से या… pic.twitter.com/OaNDEzmhSi
— ravish kumar (@ravishndtv) June 13, 2023
या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती पद्धतीने चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. ट्विटरला खरोखरच धमक्या दिल्या गेल्या असतील तर संबंधित व्यक्तींवर कारवाई देखील व्हायला हवी, अशी मागणीही खा. सुळे यांनी केली.
दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्वीटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता. हा ट्वीटरचे तत्कालीन सीईओ जॅक डॉर्से यांचा खुलासा धक्कादायक आहे.
सरकारवर टिका करणारा प्रत्येक आवाज दाबण्यासाठी दबाव होता तसेच सरकारचे ऐकले नाही तर भारतातील ट्वीटरचे… https://t.co/cU8p2aOOS2
— Supriya Sule (@supriya_sule) June 13, 2023
जॅक डोर्सी यांचे आरोप काय?
2021 मध्ये, भारत सरकारने तीन कृषी कायदे आणले होते, जे शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आले. नोव्हेंबर 2020 पासून हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकाला विरोध केला. या आंदोलनादरम्यान अनेक पत्रकार आणि यूजर्सनी ट्विटरवर मोदी सरकारविरोधात पोस्ट टाकल्या. आता ट्विटरचे जॅक डोर्सी यांनी या आंदोलनासंदर्भात एका मुलाखतीत मोठा दावा केला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकारने ट्विटरला धमकावलं होतं, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच डोर्सी यांनी असाही दावा केला की, मोदी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांची ट्विटर खाती बंद करण्यासही ट्विटरला सांगण्यात आलं, तसे न केल्यास भारतात ट्विटर बंद करण्याची आणि कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्याची धमकी देण्यात आली होती.