Download App

Earthquake : कोणत्याही क्षणी भारतात तुर्कीसारखा भूकंप? शास्त्रज्ञाचा दावा

नवी दिल्ली : भारतातील काही राज्यामंध्ये भूकंप होणार असल्याची शक्यता नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इस्टिट्युटचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव यांनी वर्तवली आहे. एवढंच नाहीतर पुढील काही दिवसांतील कोणत्याही वेळी हिमालीयन प्रदेशातील काही भागांत तीव्र भूकंपाची धक्के बसणार आहेत.

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आणि नेपाळच्या पश्चिमेकडील भागांतही हे धक्के बसणार असल्याचं सांगण्यात येतंय. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नागरिकांनी वेळोवेळी दक्षता बाळगावी अशा सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

Jitendra Awhad : दाऊदची माणसे अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये चहा पितात

भूकंपाबाबत शक्यता वर्तवताना पूर्णचंद्र राव म्हणाले की, भारतीय हिमालयीन टेक्टॉनिक प्लेटची दरवर्षी सुमारे पाच सेंमीने हालचाल होत असते. त्यामुळे हिमालययीन पर्वतांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो आणि याठिकाणी भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे.

धारावीत भीषण आग, 25 घरं जळून खाक

हीच स्थिती पुढच्या काही दिवसात निर्माण होऊन, यामुळे भूकंप होण्याची दाट शक्यता असल्याचा दावाही डॉ. पूर्णचंद्र यांनी केला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक प्लेट्सची हालचाल होत असल्याने सतत दाब निर्माण होत असतो. भारतीय टेक्टॉनिक प्लेटसची सातत्याने दरवर्षी पाच सेंमीने हालचाल होत असते, त्यामुळे हिमालयावर दबाव निर्माण होऊन भूकंप होण्याची शक्यता दाट वाढत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar Hoarding : ‘महाराष्ट्राचे  भावी मुख्यमंत्री अजितदादा’, पोस्टरची सर्वत्र चर्चा

दरम्यान, तुर्कीसारखा भूकंप उत्तराखंडमध्येही होऊ शकतो, अशा इशारा शास्त्रज्ञांनी दिला. तुर्कीमध्ये झालेल्या भुकंपाबाबत इशारा देणारे शास्त्रज्ञ फ्रँक हगरबीट्स यांनीही काही दिवसांपूर्वी असाच इशारा दिला आहे. आता नव्यानं दिलेल्या इशाऱ्यात भारतात तुर्की आणि सीरियासारखा भूकंप झाल्यास मोठा विनाश होऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Thackeray Vs Shinde : शिवसेना म्हणजे ठाकरे असं समीकरण एकनाथ शिंदेनी कसं मोडलं?

काही महिन्यातच चार धाम यात्रा सुरु होणार आहे. चार धाम यात्रेवेळी उत्तराखंडच्या डोंगरावर लाखो भाविकांची मांदियाळी होत असते. सध्या जोशीमठ येथे होणाऱ्या भूस्थलनाबाबतही चिंता व्यक्त झाली आहे. अशाच विनाशकारी भूकंप झाल्यास त्याचा फटका स्थानिकांसोबत लाखो यात्रेकरुंनाही बसू शकतो.

तुर्कस्तानमध्ये भूकंपाची (Earthquake) तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. तिथे मृतांचा आकडा पन्नास हजाराच्या आसपास गेला आहे. त्यामुळे एवढा मोठा भूकंप भारतात झाल्यास काय होईल, अशी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.

Tags

follow us