Couple viral video : गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेट्रोमध्ये रोमान्स, नाच-गाणी किंवा भांडण अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. (Couple) मेट्रोमध्ये रील्स न करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. पण, त्याचं पालन लोकांकडून केलं जात नाही. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक कपल मेट्रोमध्येच भांडण करत असल्याचं दिसत आहे.
UPSC ची तयारी करणारी महाराष्ट्राची अंजली दिल्लीत ठरली महागाईची शिकार, उचललं धक्कादायक पाऊल
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणी तरुणाला मारत आहे. तरुण म्हणत आहे की, ‘ही सार्वजनिक जागा आहे इथे मारु नको.’ तरी तरुणी त्याला मारत राहते. मुलगा म्हणतो की, ‘निघून जा इथून’. त्यावेळी दूर जात असलेली तरुणी परत येते आणि तरुणाला चापट मारते. यावेळी तरुण देखील तिला एक चापट मारतो.
वायनाड दुर्घटनेनंतर तिसरीतील विद्यार्थ्याचे पत्र होतेय व्हायरल; INDIAN ARMY ने केलं ट्वीटवर पोस्ट
तरुणी तरुणाला म्हणते, ‘थोडीतर इज्जत ठेव. लोक पाहात आहेत. मी आईला सांगणार आहे. असला मुलगा कोणालाही भेटू नये. माझ्या आयुष्यात येऊ नको. निघून जा तू इथून.’ मेट्रोमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. स्टॉप आल्यानंतर हे दोघे तरुण-तरुणी मेट्रोमधून उतरतात आणि निघून जातात. लोक या जोडप्याचे भांडण पाहून करमणूक करुन घेत असल्याचं दिसतं.
गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक कपल मेट्रोमध्येच भांडण करत असल्याचं दिसत आहे.#delhimetro #viralvideo #Coupleviralvideo pic.twitter.com/s4aBzJq9uC
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 4, 2024