UPSC ची तयारी करणारी महाराष्ट्राची अंजली दिल्लीत ठरली महागाईची शिकार, उचललं धक्कादायक पाऊल

UPSC ची तयारी करणारी महाराष्ट्राची अंजली दिल्लीत ठरली महागाईची शिकार, उचललं धक्कादायक पाऊल

IAS aspirant from Maharashtra committed suicide in Delhi’s Old Rajinder Nagar : काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमध्ये (Rajendra Nagar) यूपीएससीची (UPSC) तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. सध्या या घटनेचा तपास पोलीस करत आहे. यातच आता आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुन्या राजेंद्र नगरमध्ये पुन्हा एकदा यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अंजली ही विद्यार्थिनी जुन्या राजेंद्र नगरमध्ये पीजी रूममध्ये राहून यूपीएससीची तयारी करत होती. 21 जुलै रोजी अंजलीमी एक सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला  असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिल्ली पोलिसांनुसार, अंजलीने सुसाईड नोटमध्ये तिच्या आई – वडिलांची माफी मागितली आणि लिहिले की, मी डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा आणि आपल्या करियरमध्ये पुढे जाण्याचा खूप प्रयत्न केला मात्र मी पुढे जाऊ शकले नाही. माझा पहिल्याच प्रयत्नात UPSC पास करण्याचे स्वप्न होते. तुम्ही सर्वांनी मला खूप साथ दिली. पण मी ते करू शकले नाही. मला खूप असहाय्य वाटत आहे आणि आता मी निघून जात आहे.

तसेच या नोटमध्ये पुढे अंजलीने लिहिले की, किरण आंटी तुम्ही नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिल्या. आत्महत्या हा समस्येवरचा उपाय नाही हे मला माहीत आहे. पीजी आणि रूमचे भाडे कमी करावे. हे लोक विद्यार्थ्यांची लूट करत आहेत. हा भार अनेक विद्यार्थ्यांना सहन होत नाही. असं देखील अंजलीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

अहमदशाह अब्दालीच्या नावावरून राजकारण तापलं, जाणून घ्या कोण होता अब्दाली?

माहितीनुसार, 11 जुलै रोजी तिची मैत्रिण श्वेतासोबत व्हॉट्सॲप चॅट दरम्यान, मृत विद्यार्थिनीने सांगितले होते की, तिच्या पीजीचे भाडे वाढले आहे, त्यामुळे तिला पीजी सोडायचे आहे. अंजली रूमसाठी 15,000 रुपये द्यायची मात्र आता थेट 18,000 रुपये करण्यात आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube