अहमदशाह अब्दालीच्या नावावरून राजकारण तापलं, जाणून घ्या कोण होता अब्दाली?

अहमदशाह अब्दालीच्या नावावरून राजकारण तापलं, जाणून घ्या कोण होता अब्दाली?

Who is Ahmed Shah Abdali? : पुण्यातील मेळाव्यात बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा उल्लेख अहमदशाह अब्दालीचे (Ahmed Shah Abdali) राजकीय वंशज असा केल्याने भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे.  मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? दुर्राणी साम्राज्याचा अफगाण संस्थापक अहमदशाह अब्दाली कोण होता? या लेखात जाणून घ्या कोण होता? अहमदशाह अब्दाली.

कोण होता अहमदशाह अब्दाली?

अहमदशाह अब्दाली दुर्राणी साम्राज्याचा अफगाण संस्थापक होता. अब्दालीला अफगाणिस्तानाचा जनक मानला जातो. त्याचा जन्म 1722 मध्ये झाला होता. अफशरी साम्राज्याच्या सैन्यात सैनिक म्हणून तो दाखल झाला होता त्यानंतर अगदी कमी वेळेत तो चार हजार अब्दाली पठाणांचा प्रमुख बनला आणि इराणाचा अफशरी सम्राट नादीरशाह अफशर यांच्या मृत्यूनंतर अब्दाली खोरासानाचा तो अमीर बनला. त्यानंतर पाटणी टोळ्यांना घेऊन त्याने भारतावर पाच वेळा भारतीय उपखंडावर आक्रमणे केली.

तसेच अमीर बनल्यानंतर दोन-तीन वर्षांच्या आतच वर्तमान काळातील अफगाणिस्तान, पाकिस्तान, ईशान्य इराण व भारतीय उपखंडातील पंजाब प्रदेशात त्याने आपली सत्ता विस्तारली. तर 1761 साली पानिपताच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांना हरवले.

1761 मध्ये मराठे व अब्दाली यांच्यात पानिपतचे तिसरे युद्ध झाले. यापूर्वी देखील त्याने भारतावर चार स्वाऱ्या केले होते. भारतातील राजकिय गोंधळाचा फायदा घेऊन जानेवरी 1748 मध्ये त्याने भारतावर पहिली स्वारी केली होती. पंजाबचा मोगल सुभेदार शहानवाजखानाचा पराभव त्याने दिल्लीवर चाल केली. दिल्लीच्या बादशहाने (महमदशहा) त्याच्याविरुद्ध आपला मुलगा अहमदशहा वजीर कमरुद्दीन आणि मीरबक्षी सफदरजंग यांना पाठवले होते.

अब्दाली आणि वजीर कमरुद्दीन यांच्यात 21 मार्च रोजी मनुपूर येथे लढाई झाली आणि अब्दालीचा पराभव झाला मात्र तो संपला नव्हता. त्याने पुन्हा एकदा इ.स. 1749 मध्ये भारतावर स्वारी केली. तेव्हा पंजाबचा सुभेदार मीरमन्नूने वजीरबादजवळ अब्दालीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र दिल्लीहून मदत न मिळाल्याने त्याने अब्दालीशी तह केला. पंजाबच्या उत्तरेकडील चार जिल्हे व 1 लाख रुपये खंडणी या तहानुसार अब्दालीला मिळाली. तर 1773 मध्ये अब्दालीचा मृत्यू झाला.

Paris Olympics 2024 : दीपिका कुमारीने केली कमाल, तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

काय म्हणाले होते ठाकरे?

पुण्यातील मेळाव्यात बोलताना म्हणाले होते की, शाहिस्तेखान हुशार होता. त्याचं बोटावर निभावलं. पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. हे परत आले. त्यांनी शहाणपण घेतलं नाही. महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कुठं कुठं उठले ते पाहण्यासाठी आले होते. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह आला होता. तोही शाहच होता. तो अहमद शाह होता हा अमित शाह आहे. असं ठाकरे म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube