Download App

Video : आधी म्हणाला देशात रहायला भिती वाटते; आता केले ‘मन की बात’चे कौतुक

Aamir Khan On Man Ki Baat :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे 100 भाग पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने दिल्ली येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यासाठी अनेक मान्यवर लोक उपस्थित होते. तसेच हिंदी सिनेसृष्टीतील काही कलाकार देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान देखील या कार्यक्रमासाठी हजर होता. त्याने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओवर होत असतो. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे समस्त देशवासियांसोबत संवाद साधतात. यावेळी ते बोलताना आपल्या देशातील अतिशय स्थानिक भागातील कर्तृत्वान लोकांची, महिलांची, खेळाडूंची उदाहरणे देत असतात. तसेच अनेक प्रेरणादायी गोष्टी ते या कार्यक्रमातून सांगत असतात. त्यांच्या या कार्यक्रमाचे 100 भाग पूर्ण झाल्याने आमिर खाननेदेखील त्यांचे कौतुक केले आहे.

‘मन की बा’त या कार्यक्रमाचा लोकांवर खोलवर परिणाम झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम ही एक ऐतिहासिक घटना आहे, अशा शब्दात आमिर खानने मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाचे  कौतुक  केले आहे. पण त्याने केलेल्या या वक्तव्यावरुन अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत.

याचे कारण त्याची पत्नी किरण रावने काही वर्षांपूर्वी मला या देशात राहण्याची भिती वाटते, असे विधान केले होते. यावरुन देशभरात मोठा गदारोळ झाला होता. किरण रावचे हे वक्तव्य आमिरने जाहीर एका कार्यक्रमास सांगितले होते. त्यावेळी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी आमिरच्या या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. किरण रावच्या या वक्तव्यावरुन आमिर खान व तिच्यावर संबंध देशभरातून टीका करण्यात आली होती.

कर्नाटक BJP कडून तब्बल दीड लाख कोटी रुपयांची लूट, प्रियंका गांधींनी केले आरोप

दरम्यान,  काही महिन्यांपूर्वी आमिर खान व किरण राव यांचा घटस्फोट झाला आहे. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आमिर खानचा लालसिंग चड्ढा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला होता. या सिनेमावरुन देखील बरीच काँट्रावर्सी झालेली पहायला मिळाली.

Tags

follow us