Raghav Chadha Delhi Liqor Policy : दिल्ली सरकारमधील माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर दारु घोटाळ्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते जेलमध्ये आहेत. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये राघव चढ्ढा यांचा नावाच उल्लेख करण्यात आला आहे.
AAP Rajya Sabha MP Raghav Chadha's name also mentioned in ED's Delhi liquor policy case supplementary chargesheet.
Statement reads- …at Deputy CM Manish Sisodia’s residence, there was a meeting of Raghav Chadha, ACS Finance of Punjab Govt, Excise Commissioner, Varun Roojam,… pic.twitter.com/g4QOLSYnTF
— ANI (@ANI) May 2, 2023
आता आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांचे नाव उत्पादन शुल्क धोरणाच्या बाबतीत समोर आले आहे. ईडीच्या आरोपपत्रानुसार, मनीष सिसोदियाचे पीए सी अरविंद यांनी त्यांच्या वक्तव्यात राघव चढ्ढा यांचे नाव घेतले आहे. आरोपपत्रानुसार, सी अरविंद यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली ज्यामध्ये राघव चढ्ढा, पंजाबचे एक्साइज कमिश्नर, उत्पादन शुल्क अधिकारी आणि विजय नायर उपस्थित होते. चार्जशीटमध्ये राघव चढ्ढा यांचे नाव असले तरी त्यांचा आरोपी म्हणून उल्लेख नाही.