दिल्लीतील लाठीमारावरून सरकारवर गंभीर आरोप; आंदोलनकर्त्यांवरील कारवाईवर अभिजीत दिपके आक्रमक

लाठीचार्जनंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत निषेध व्यक्त केला.

Abhi

Abhi

Abhijeet Dipke Slams Police Action Against Protesters: संसदेकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत निषेध व्यक्त केला. मंगळवारी (21 जुलै) जंतरमंतर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईला “अमानुष” संबोधले.

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; नेटवर्क नसतानाही होणार पेमेंट, ‘Tap-to-Pay’ फीचर काय?

दिपके यांनी दावा केला की, लाठीमारात अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जखमी झाले. काही अल्पवयीन मुलींसोबतही पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला. एका 12 वर्षीय मुलीला गंभीर दुखापत झाल्याचा, तर एका किशोरवयीन विद्यार्थिनीला गळ्यावर मार लागल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. आंदोलनादरम्यान काही विद्यार्थिनींना पोलिसांनी मारहाण केल्याचे आपण प्रत्यक्ष पाहिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांना अतिप्रमाणात बळाचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले होते का? तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधातील आंदोलन दडपण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपींना सोडणार नाही, कठोर शिक्षा होणार; PM मोदी पहिल्यांदाच बोलले

आणखी जीवितहानी टाळण्यासाठी मोर्चा मागे घेतला

अभिजीत दिपके यांनी सांगितले की, परिस्थिती अधिक चिघळू नये आणि आंदोलनकर्त्यांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून संसद मोर्चा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या मते, पोलिसांकडे जमाव नियंत्रणासाठी वॉटर कॅननसारखे पर्याय उपलब्ध असतानाही थेट लाठीमार करण्यात आला. त्यांनी आरोप केला की, पोलिसांची कारवाई केवळ आंदोलन थांबवण्यासाठी नव्हती, तर भविष्यात सरकारविरोधात आवाज उठवण्यापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न होता.

CJP Protests : CJP च्या आंदोलनामागे पाकिस्तान? सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरु

150 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा

दिपके यांनी सांगितले की, या कारवाईत सुमारे 150 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या एका विद्यार्थिनीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी, तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास त्याची जबाबदारी केंद्र सरकारवर असेल, असे त्यांनी म्हटले.

लॉर्ड्सवर सैफ अली खानच्या शाही अंदाजाची चर्चा; खास टायमागील परंपरेची कहाणी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न

जंतरमंतर परिसरात कडेकोट तपासणी सुरू असतानाही दगडांनी भरलेले ट्रक तेथे कसे पोहोचले, असा सवालही दिपके यांनी उपस्थित केला. या घटनेची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, काही सिव्हिल ड्रेसमधील व्यक्तींनीही आंदोलनकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांच्याशीही पोलिसांनी गैरवर्तन केले, तसेच अभिनेते प्रकाश राज यांनीही मारहाण केली असा दावा त्यांनी केला.

मोठी बातमी! जंतरमंतरवरील आंदोलकांवर दिल्ली पोलिसांकडून लाठीमार्च, वातावरण तापलं

केंद्र सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप नाही

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी केलेल्या आरोपांवर दिल्ली पोलीस किंवा केंद्र सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसून, पुढील तपास आणि अधिकृत निवेदनानंतरच घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. दिल्लीतील या घटनेमुळे आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या कारवाईबाबत विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Exit mobile version