ACB entry to Arvind Kejariwal house : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस अगोदरच दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात आता आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे एसीबीची टीम दाखल झाली आहे. 4 सदस्यांचं पथकाकडून त्यांच्या घरी पोहचले. त्यामुळे त्यांच्या घराबाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
मोठी बातमी! ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले, वाचा नेमकी कारणे काय?
आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी भाजपवर आमच्या 7 आमदारांना 15 कोटींची ऑफर दिली, असा आरोप केला होता. त्यासंदर्भात तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी एसीबीकडून त्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानुसार एसीबीची टीम आप नेते संजय सिंह आणि मुकेश अहलावत आणि अरविंद केजरीवाले घरी पोहोचली होती.
मात्र यावेळी आपचे कायदेशीर सेलचे प्रमुख संजीव नासियार म्हणाले की, एसीबीकडे कोणतीही कायदेशीर नोटीस नाही. त्यांना तपासाचे कोणतेही अधिकार आहेत. मात्र यावेळी एसीबीकडून आमच्याकडे तक्रार आणि आपच्या दाव्यांचे पुरावे आहेत. मात्र त्यांना आपच्या कायदेशीर टीमसोबतच संवाद साधता आला. तसेच आपने त्याबाबत तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाल्यानंतर आता दिल्लीमध्ये (Delhi Elections Results) कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र त्या अगोदरच आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी भाजपवर आमच्या 7 आमदारांना 15 कोटींची ऑफर दिली, असा आरोप केला होता.
धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ घेतला गळफास
निकालापूर्वीच भाजपने पराभव स्वीकारला आहे. आम्ही आमदारांनाहे ऑडिओ कॉल रेकॉर्ड करण्यास आणि त्याबद्दल तक्रार करण्यास सांगितलंय. आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आहे, केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा देखील संजय सिंह यांनी केलीय. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आलेल्या आठ ‘आप’ आमदारांनी 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी १ फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
आमदारांनी पक्षातून राजीनामा देण्याचे कारण कथित भ्रष्टाचार आणि ‘आप’च्या विचारसरणीपासून विचलन असल्याचं सांगितलं होतं. संजय सिंह म्हणाले की, निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सात आमदारांना या ऑफर मिळाल्या आहेत. ते त्यांना 15 कोटी रुपये देण्याबद्दल आणि आम आदमी पक्ष सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास ऑफर देत आहेत. त्यावरून भाजपने तक्रार करताच दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानुसार एसीबीकडून कारवाई करण्यात आली.