Accident : उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे भीषण अपघात (Accident) झाला असून या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. नैनितालहून हरियाणाकडे परतत असणाऱ्या स्कूलबसला हा अपघात झाला. नैनितालच्या घटगडजवळ हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. स्कूल बस खड्ड्यात पडली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एसडीआरएफ पोलीस आणि एनडीआरएफसह मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हरियाणातील हिसार येथील फ्युचर पॉइंट पब्लिक स्कूलची ही बस होती. ही बस नैनिताल येथे शैक्षणिक सहलीसाठी आली होती. या अपघातात पाच महिला, एक मुलग आणि चालकाचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर हल्दवानी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये अजकलेल्या प्रवाशांना दोरीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या अपघातातील कारची ओळख मात्र पटलेली नाही. संध्याकाळी मंगोलीजवळ बसला अपघात झाला. अपघातातील जखमींनी योग्य उपचार दिले जातील, अशी माहिती नैनितालच्या डीएम वंदना सिंह यांनी दिली.
हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तर दुसरीकडे पोलिसांकडून या घटनेची माहिती घेतली जात आहे. या घटनेचा तपासही केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघात घडण्याचं नेमकं कारण काय होतं याची माहिती समोर येईल.
दरम्यान, महामार्गांवर वाहने भरधाव वेगात असतात. वेग नियंत्रित नसतो. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.