Punjab Bus Accident : पंजाबमधील भटिंडा येथे भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, भटिंडामधील तलवंडी साबो रोडवर भरधाव वेगाने जाणारी बस नाल्यात (Punjab Bus Accident) पडली. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणाची माहिती देत भटिंडाचे आमदार जगरूप सिंग गिल (Jagroop Singh Gill) यांनी सांगितले की, बस अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जणांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहे.
VIDEO | Punjab: At least eight people lost their lives after a bus fell off a bridge in Bathinda amid heavy rainfall. Rescue operation is underway and details are awaited.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/y7o8PfmqOt
— Press Trust of India (@PTI_News) December 27, 2024
तर सुमारे 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बस सर्दुलगढहून भटिंडाकडे जात असताना जीवन सिंग वाला गावात नाल्यात पडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पीडितांना मदत करण्यासाठी आणि नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी मदत कार्य चालू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
Bathinda, Punjab: A bus carrying around 50 passengers fell into a drain in Jiwan Singh Wala Village, while traveling from Sardulgarh to Bathinda. The accident has resulted in two fatalities and several injuries. Relief operations are ongoing to assist the victims and assess the… pic.twitter.com/hkAaJsLFav
— IANS (@ians_india) December 27, 2024
माहितीनुसार , बस भटिंडाकडे जात असताना हा अपघात झाला. स्थानिक लोकांनी तत्काळ घटनास्थळ गाठून लोकांना बसमधून बाहेर काढण्यास मदत केली. तसेच पोलीस आणि जिल्हा प्रशासनानेही बचावकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात नेले. या भागात हवामान खराब असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सपना चौधरी, रश्मिका मंदाना अन् प्राजक्ता माळी… सुरेश धस यांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल