Actor Prakash Raj Reveals His Name Deleted During SIR : प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी मतदार यादी आणि SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेवर गंभीर सवाल उपस्थित केला आहे. SIR प्रक्रियेदरम्यान बंगळुरू मतदारसंघातील आपले नाव मतदार यादीतून हटवण्यात आल्याने मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आल्याचा दावा प्रकाश राज यांनी केला आहे. विशेष म्हणजे, बंगळुरूमध्येच जन्म आणि शिक्षण झाल्याचा उल्लेख करत त्यांनी या प्रकारावर उपरोधिक शब्दांत नाराजी व्यक्त केली. प्रकाश राज यांनी X वर एक व्हिडिओ शेअर करत मतदार यादीतून नाव वगळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हा तर एक मोठा विनोद आहे. असंच सुरू ठेवा,” अशा शब्दांत त्यांनी या प्रकारावर टीका केली.
Prakash Raj: नेमकं रिकामं काय? नरेंद्र मोदी, अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा उडवली खिल्ली
‘वोटर आयडीसाठी कोणती कागदपत्रं दाखवावी लागतील ते पाहतो’
प्रकाश राज यांनी व्हिडिओमध्ये आपले नाव मतदार यादीतून का आणि कसे हटवण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित करत माझं वोटर आयडी परत मिळवण्यासाठी आता कोणकोणती कागदपत्रं दाखवावी लागतात, ते पाहू. असं म्हणत “गेम सुरू आहे,” असे विधान करतया संपूर्ण प्रकाराला आव्हान दिलं आहे.
‘मतदानाचा अधिकार रोखू शकता, पण…’
प्रकाश राज यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमधूनही तीव्र प्रतिक्रिया दिली. सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना त्यांनी म्हटलं की, कदाचित तुम्हाला पुन्हा सत्तेत आणणार नाहीत अशा काही नागरिकांचा मतदानाचा अधिकार तुम्ही हिरावून घेऊ शकता; पण ज्या सत्तेवर तुम्ही बसला आहात, तिथून तुम्हाला खाली खेचण्यापासून तुम्ही आम्हाला रोखू शकता का? त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
E20 पेर्टोलवरून भाजप खासादाराने बाप काढला, भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त वक्तव्य
काही महिन्यांपूर्वी वोटर आयडीवरूनच वाद
विशेष म्हणजे, प्रकाश राज यांचं नाव याआधीही मतदार ओळखपत्राच्या मुद्द्यावरून वादात आलं होतं. जूनमध्ये बंगळुरूमधील एका न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याचं वृत्त समोर आलं होतं. 2019 मध्ये वकील दिलीप कुमार यांनी हलसूरू गेट पोलीस ठाण्यात प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. प्रकाश राज यांच्याकडे कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणासह अनेक राज्यांतील मतदार ओळखपत्रे असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
तक्रारीवर कारवाई न झाल्याने तक्रारदाराने पोलीस आयुक्त आणि निवडणूक आयोगाशी संपर्क साधल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने प्रकाश राज यांना हजर राहण्यासाठी दोनदा समन्स बजावले होते. मात्र ते न्यायालयात हजर न राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं.
‘दृश्यम ३’मध्ये दिसणार प्रकाश राज
अभिनयाच्या आघाडीवर प्रकाश राज लवकरच ‘दृश्यम 3’ मध्ये दिसणार आहेत. याशिवाय त्यांचे काही दाक्षिणात्य चित्रपटही प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. अभिनयासोबतच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर परखड भूमिका मांडण्यासाठी प्रकाश राज प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी आंदोलनांसह विविध सामाजिक विषयांवर त्यांनी यापूर्वीही उघडपणे भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता SIR प्रक्रियेबाबत त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Fraand 😂😂 you may chose n deny voting rights of few citizens who may not elect you back to thrown.. but can you stop us from eventually bringing you down from your thrown #justasking pic.twitter.com/S8BpM3CNy0
— Prakash Raj (@prakashraaj) August 11, 2026
