Download App

Adani Video : गौतम अदानी पुन्हा बरसले! हिंडेनबर्गमुळे अदानी समुहालाच नव्हे तर, शेअर मार्केटलाही फटका बसला

Adani on Hindenburg Report : जानेवारीमध्ये युनायटेड स्टेट्स-आधारित शॉर्ट-सेलर हिंडनबर्ग संशोधन संस्थेना अदानींवर आरोप केले होते. उद्योगपती गौतम अदानी यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हा अहवाल हा चांगलाच गाजला होता. या अहवालाने अदानी यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली होती. त्यानंतर अदानींच्या कंपन्या आणि त्यासंबंधित विविध घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. त्यावर आता पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांनी व्हिडीओ शेअर करत जोरदार निशाणा साधला आहे. ( Adani Group Gautam Adani Again Shout on Hindenburg Report said Adani Group more strong after report)

भाजपने सोमय्यांचा बळी दिला; ‘त्या’ व्हिडीओवरुन अंधारेंचे ट्विट चर्चेत

काय म्हणाले गौतम अदानी?

शॉर्ट-सेलर हिंडनबर्ग अहवाल हा केवळ अदानी समुहाला बदनाम करण्यासाठी चुकीच्या माहिती देणारा होता. तसेच त्यातील बहुतांश माहिती ही 2004 ते 2015 मधील होती. त्याला संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावेळी उत्तरं देखील दिली होती. पुढे अदानी म्हणाले हा अहवाल येऊन देखील अदानी समुहाचं बॅलन्सशीट, संपत्ती, रोख्यांचा प्रवाह उत्तरोत्तर मजबूत होत आहे. तसेच समूहाची राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय भागीदारी याचा पुरावा आहे. समुह आता ऑस्ट्रेलिया, इस्त्राइल, बांग्लादेश आणि श्रीलंकेत विस्तार केल आहे. असं देखील अदानी म्हणाले.

दरम्यान या अहवालाचे आम्ही तात्काळ खंडन केले होते. तरी देखील या कंपनीने त्याचा गैरफायदा घेतला. त्यांनी माध्यमांमध्ये अदानी समुहासंदर्भात खोट्या बातम्या दिल्या. यावर सुप्रीम कोर्टाने आरोपांची शहानिशा करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. मात्र त्या समितीला देखील यामध्यें काहीही गैर आढळले नाही. असं म्हणत उद्योगपती गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग रिसर्चवर जोरदार निशाणा साधला आहे.

काय आहे हिंडेबर्ग रिसर्च?

हिंडनबर्ग रिसर्च ही आर्थिक संशोधन संस्था आहे. जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते. त्यात त्यांचा मुख्य उद्देश हा मानवनिर्मित आपत्ती आणि आर्थिक अनियमितता तपासणे हा आहे. या कंपनीची स्थापना नॅथन अँडरसन यांनी केली.हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने एखाद्या कंपनीवर रिसर्च प्रकाशित केल्यानंतर पुढील कारवाईपूर्वीच अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. 24 जानेवारी रोजी, हिंडेनबर्ग या यूएस-आधारित शॉर्ट सेलर कंपनीने अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशनसारख्या गंभीर आरोपांसह अनेक आरोप करणारा अहवाल जारी केला. यानंतर श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी यांची घसरण झाली. ही घसरण त्यांना थेट 20व्या स्थानावरूनही खाली घेऊन आली.

नितेश राणेंनी फडणवीसांना जाब विचारावा; नगर हत्याकांडावरुन काँग्रेस आक्रमक

Tags

follow us