Download App

गौतम अदानींसाठी राजीव जैन ठरले संकटमोचक; आजमितीला 6.58 लाख कोटींचा नफा

  • Written By: Last Updated:

Adani Group : बीएसई लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मंगळवारी प्रंचड वाढले. अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्येही सलग तीन दिवस तीव्र वाढ झाली. गौतम अदानींनी सुमारे 6.58 लाख करोडची कमाई केली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते आता 16 व्या क्रमांकावर आहे. मात्र, अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्सची घसरण झाली होती. कंपनीचे शेअर्स रसातळाला जात असतांना सातासमुद्रापलीकडून एक संकटमोचक आळा आणि त्यांनी अदानींच्या कंपन्याना मदतीचा हात दिला. त्या ट्रबलशूटरचे नाव आहे राजीव जैन(Rajeev Jain).

‘हिंमत असेल तर निवडणुकीआधी POK ताब्यात घ्या’; काँग्रेस नेता मोदी-शहांना भिडला 

सलग तीन दिवस अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तीव्र वाढ झाल्यानंतर गुरुवारीही समूह कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. मात्र ही प्रक्रिया आत्ता सुरू झाली नाही, तर सुमारे 9 महिन्यांपूर्वी जेव्हा अदानी समूहाच्या कंपन्यांवरील विश्वास उडाला होता. त्यावेळी राजीव जैन याच्या GQG कंपनीने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर गुंतवणूकदारांचा विश्वासही कंपनीवर परत येऊ लागला.

राजळेंना शह देण्यासाठी ढाकणे झाले अॅक्टिव्ह; रस्त्याच्या कामावरून आरोप-प्रत्यारोप 

जेव्हा राजीव जैन यांनी पहिल्यांदा अदानीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. तेव्हापासून, अदानी समूहाचे मूल्यांकन $ 79 अब्ज म्हणजेच 6.58 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. अदानी समूहाला पुनरुज्जीवित करण्यात राजीव जैन यांची किती मोठी भूमिका आहे, हे यावरून लक्षात येतं. त्याआधी हिंडेनबर्ग संशोधन अहवाल जाहीर झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. यामुळे अदानी समूहाच्या मार्केट कॅपमधून $150 बिलियनचे नुकसान झाले. मात्र, राजीव जैन आणि त्यांची फर्म अदानी समूहासाठी संकटमोचक ठरली.

किती गुंतवणूक केली

राजीव जैन यांनी अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि इतर दोन समूह कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या दुप्पट झाले आहे. फर्मच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सुरुवातीला अदानी ग्रुपमध्ये $1.9 बिलियनची गुंतवणूक केली होती. त्यानंतरही अमेरिकन फर्मने अदानीचे शेअर्स विकत घेतले. ज्यांचे मूल्य गेल्या आठवड्यापर्यंत 7 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढले आहे. GQG पोर्टफोलिओ व्यवस्थापक सुदर्शन मूर्ती यांनी या आठवड्यात एका मुलाखतीत सांगितले की अदानी समूहाच्या व्यवसायाबद्दल GQG खूप उत्साहित आहे. अदानी समूहातील गुंतवणुकीतून झालेल्या नफ्यावर भाष्य करण्यास मूर्ती यांनी नकार दिला.

या कारणांमुळे तेजी
जैन यांच्या फर्मने अशा वेळी गुंतवणूक केली जेव्हा अदानी यांचे शेअर्स बुडत होते. या आठवड्यात शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे तीन मोठ्या राज्यांमध्ये भाजपचा विजय आणि ग्रुपच्या ग्रीन एनर्जी युनिटला $1.4 अब्ज इतकं मिळालेलं कर्ज. याशिवाय, अमेरिकन सरकारी एजन्सीकडून हिंडनबर्गच्या आरोपातून क्लीन चिट मिळणे देखील समूह कंपन्यांसाठी चांगली बाब सिध्द झाली.अदानी पोर्टला श्रीलंकेच्या प्रकल्पासाठी अमेरिकन सरकारकडून 553 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मिळाले आहे.

या कंपन्यांमध्ये गुंतवणूक
राजीव जैन यांनी एप्रिलमध्ये ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ही गुंतवणूक पाच वर्षांत मल्टीबॅगर होऊ शकते. GQG कडे अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी पॉवर लिमिटेड, अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट्स लिमिटेडमध्ये भागभांडवल आहे.

कोण आहेत राजीव जैन?

GQG Partners चे मालक राजीव जैन यांचा जन्म भारतात झाला. मियामी विद्यापीठातून एमबीए पूर्ण करण्यासाठी ते अमेरिकेत गेले. व्होंटोबेल कंपनीत ते 1994 मध्ये रुजू झाले. 2022 मध्ये स्विस फर्मचे सीईओ बनले. सध्या जीव जैन, GQG भागीदार धोरणांसाठी पोर्टफोलिओ व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीला 2023 मध्ये मॉर्निंगस्टार फंड मॅनेजर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला., आयटीसी, एचडीएफसी, आरआयएल, आयसीआयसीआय, एसबीआय, इन्फोसिस, टाटा अशा मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांची हिस्सेदारी आहे.

Tags

follow us