Download App

भाजी मंडईनंतर आता राहुल गांधी फर्निचर मार्केटमध्ये; म्हणाले, थोडं शिकण्याचाही प्रयत्न केला…

Rahul Gandhi News : मेकॅनिक, शेतकऱ्यांची भेट, भाजी मंडईत संवादानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) थेट फर्निचर मार्केटमध्ये पोहचल्याचं दिसून येत आहे. दिल्लीस्थित प्रसिद्ध फर्निचर मार्केटमध्ये राहुल गांधींनी कामगारांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांनी फर्निचर कामगारांसोबत संवाद साधतानाच फोटो आपल्या ट्विटर हॅंडलवर पोस्ट केला आहे. सध्या या फोटोची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

नूकताच राहुल गांधी यांनी एका फर्निचर दुकानातील फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी फर्निचरचं काम करताना दिसून येत आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत इतर कर्मचारी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीतल्या फर्निचर मार्केटला राहुल गांधी यांनी नूकतीच भेट दिलीयं. या भेटीची दृश्य सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी म्हटलं, हे कामगार मेहनतीसोबत कमालीचे कलाकार आहेत, मजबूती आणि खुबसूरती पारखण्यात ते माहिर आहेत, अनेक चर्चा झाल्या त्यांच्या गुणवत्तेबद्दल जाणून घेतलं, त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्नही केला असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हँगिग गार्डन सात वर्षांसाठी होणार बंद

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी एका ट्रकमध्ये प्रवास करुन ट्रकचालकांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी मेकॅनिकचीदेखील भेट घेतल्याचं समोर आलं होतं. मेकॅनिकच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी भाजीमंडईतल्या एक सर्वसामान्य नागरिक रामेश्वरची भेट घेतली होती.

Nitesh Rane : वडेट्टीवारांवर लक्ष ठेवा कदाचित ते मंत्री होतील; राणेंचा पटोले-राऊतांना खोचक टोला

यासंदर्भातील पोस्ट राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर केली होती. पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, “देशाची दोन वर्गात विभागणी होत आहे, “एकीकडे सत्तेचे संरक्षण करणारे शक्तिशाली लोक आहेत, ज्यांच्या सांगण्यावरुन देशाची धोरणं बनवली जात आहेत आणि दुसरीकडे एक सामान्य भारतीय आहे, भाजीपाल्यासारख्या मूलभूत गोष्टीही ज्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील ही वाढती दरी आपल्याला भरुन काढायची आहे आणि हे अश्रू पुसायचे आहेत, अशा आशयाचे ट्विट गांधी यांनी केलं होतं.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देशभरात चांगलीच चर्चेत आली होती. आत्ताही राहुल गांधी वेगवेगळ्या मार्केटमध्ये पोहचून नागरिकांच्या व्यथा जाणून घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या दौऱ्यात ते देशाच्या विविध भागातील लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत.

Tags

follow us