Nitesh Rane : वडेट्टीवारांवर लक्ष ठेवा कदाचित ते मंत्री होतील; राणेंचा पटोले-राऊतांना खोचक टोला
Nitesh Rane : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election) सुरू झाली असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सन 2024 पर्यंत भाजप फुटेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता. त्यावर आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार पलटवार केला आहे.
राणे यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरे गटासह काँग्रेसवरही जोरदार टीका केली. राणे म्हणाले, भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमच्या विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. विरोधी पक्षनेते हे हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा आमच्या महायुती सरकारमध्ये सुरू आहे अशा शब्दांत त्यांनी पटोले आणि राऊतांना खोचक टोला लगावला.
Sanjay Raut : नागपूर पाण्यात बुडालं अन् तुम्ही कलाकारांसोबत… राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल
यानंतर राणे यांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केली. बारामतीती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार निवडणूक होईल का यावर प्रतिक्रिया दिली होती. हाच मुद्दा उचलत राणे यांनी राऊतांवर सडकून टीका केली. संजय राऊतांना पवार कुटुंब फार चांगले माहिती आहे. त्यांच्या घराचे रेशन काड्या लावण्यामुळेच येते. बारामतीबद्दल बोलणे फार लांब आहे. सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य बारामतीसह महाराष्ट्रात आहे. असंख्य लोकांना जीवदान देण्याचे काम त्या वर्षानुवर्षे करत आहेत. म्हणून सुनेत्रावहिनी उद्या खासदार बनल्या तर हे राज्यासाठी आणि त्यांच्या मतदारसंघासाठी भलं होईल, असे राणे म्हणाले.
संजय राऊत राजकारणातले शक्ती कपूर
यावेळी राणेंनी महिला आरक्षणावरून राऊतांना टार्गेट केले. ते म्हणाले की, महिला आरक्षणाचा सर्वात जास्त त्रास संजय राऊतांना होणार आहे. कारण राजकारणातील शक्ती कपूर जेलमध्ये असणार आहे. त्यामुळे महिला आरक्षणाची सर्वात जास्त भीती राऊतांना वाटणं रास्त आहे. राज्यातील सध्याच्या त्रिशूळ सरकारबाबत कुणीही कितीही पुड्या सोडल्या तरी कुणी काहीच वाकडं करू शकत नाही असेही राणे म्हणाले.
मोठी बातमी : माजी खासदार विजय दर्डांसह पुत्राला दिलासा; कोळसा घोटाळा प्रकरणातील शिक्षेला स्थगिती
उबाठा म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी
काँग्रेस हा गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाल्याची टीका सामनातून करण्यात आली होती. यावर पलटवार करताना राणे म्हणाले की, भाजपा गंजलेला बांबू तर तुमची उद्धव बाळसाहेब ठाकरे म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी असल्याचे राणेंनी म्हटले आहे.