Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची सूचना जारी करण्यात आली. कुठल्याही उंच पर्वतांवर ट्रेकिंगसाठी (Trekking) न जाता फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यावा, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. हा आदेश संपूर्ण जम्मू-काश्मीरसाठी लागू आहे.
मोठी बातमी, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि लष्कराने संयुक्तपणे सुरक्षा व्यवस्था कडक केली. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राज्याच्या वरच्या भागात तसेच जंगलात सुरक्षा दलांकडून शोध मोहिम सुरू झाली. उंचावरील भागात अतिरिक्त गस्त वाढवण्यात आली. तसेच आणि ड्रोनद्वारे पाळत ठेवली जातेय. अशा परिस्थितीत, राज्यात येणाऱ्या पर्यटकांनी आणि गिर्यारोहकांनी ट्रेकिंगसाठी वरच्या भागात आणि जंगलात जाऊ नये, तर फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच सहलीचा आनंद घ्यावा, असं सांगण्यात आलं.
Video : सभास्थळी विरोधकांचा गोंधळ, सिद्धारामय्यांनी भरसभेत उगारला पोलीस अधिकाऱ्यावर हात
पहलगामच्या वरच्या भागात कोणत्याही प्रकारच्या पर्यटन मोहिमा आणि ट्रेकिंगवर सध्या पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, असं स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्लाही पर्यटकांना देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे की परिस्थिती सामान्य होईपर्यंत ट्रेकिंगवर बंदी राहील.
दरम्यान, दरवर्षी हजारो लोक जम्मू आणि काश्मीरमध्ये ट्रेकिंगसाठी येतात. मात्र, आता ट्रेकिंगसाठी न जाता फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यावा असं सांगण्यात आल्यानं ट्रेकिंग प्रेमींसाठी मोठा धक्का आहे.
दरम्यान, गेल्या सोमवारी (२२ एप्रिल) पहलगामपासून ५ किमी अंतरावर असलेल्या बैसरन येथे दहशतवाद्यांनी नि:शस्त्र पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर या घटनेत २२ पर्यटक जखमीही झाले. या घटनेनंतर, राज्यातील बहुतेक पर्यटक तात्काळ माघारी फिरल होते.