Video : सभास्थळी विरोधकांचा गोंधळ, सिद्धारामय्यांनी भरसभेत उगारला पोलीस अधिकाऱ्यावर हात

Video : सभास्थळी विरोधकांचा गोंधळ, सिद्धारामय्यांनी भरसभेत उगारला पोलीस अधिकाऱ्यावर हात

 

Siddaramaiah Try To Slap Police Officer Video: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. कॉंग्रेसच्या (Congress) एका सभास्थळी भाजप महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनामुळं संतप्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षकांव भरसभेतच हात उगारला. कर्नाटकात हा प्रकार घडला. सिद्धरामय्या यांच्या या कृतीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘पी.एस.आय. अर्जुन’मधील प्रमोशनल साँगचा धुमाकूळ, ‘पुष्पा’फेम नकाश अजीजला अंकुश चौधरीची जोड 

सिद्धरामय्या यांनी आज बेळगावमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. या सभेच्या ठिकाणी भाजप महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. स्टेजच्या सुरक्षेसाठी सहाय्यक पोलिस अधीक्षक नारायण भारमानी यांना तैनात करण्यात आले होते. महिला कार्यकर्त्यांनी केलेला गोंधळ ऐकून सिद्धरामय्या संतापले. सिद्धरामय्या यांनी ताबडतोब स्टेजजवळ तैनात असलेल्या पोलिस अधीक्षकांना स्टेजवर बोलावले आणि सुरक्षा व्यवस्थेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर त्यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षकांवरच हात उगारला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.

अजितदादांचा मोठा निर्णय, अन्न व नागरी पुरवठा विभागातील जुने आदेश रद्द होणार 

या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की, महिला कार्यकर्त्यांनी निदर्शन केल्यानं मंचावर असलेले सिद्धरामय्या यांना राग अनावर झाला. त्यांनी संतप्त होत पोलिस अधिकाऱ्याला बोलावून विचारलं की, अरे इकडे ये, एसपी कोन आहे? तुम्ही लोक काय करताय? अशी खरडपट्टी काढत करत सिध्दारामय्या यांनी हात उगारला. मात्र, सिद्धरामय्या यांचा तो पवित्रा पाहून हे पोलिस अधिकारी मागे हटले. दरम्यान, सिद्धरामय्या यांच्या कृत्यामुळं ते पोलिस अधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न करत होते, असं या व्हिडिओमधून दिसंतय. सिद्धरामय्या यांच्या आक्रमक वर्तनामुळे कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकाराबाबत जेडीएसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटलं की, सिद्धरामय्या, तुम्हाला सत्तेचा अहंकार आणि माज आलाय. जिल्हा पोलिस अधीक्षकांशी सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना रस्त्यावरील गुंडासारखा एकेरी शब्द वापरलाय, आणि एसपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय, हा अक्षम्य गुन्हा आहे. तुमचा कार्यकाळ फक्त ५ वर्षांचा आहे पण एक सरकारी अधिकारी ६० वर्षांपर्यंत सेवा करतो. सत्ता कोणासाठीही कायमची नसते. तुमचे चुकीचे वर्तन दुरुस्त करा, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube